
महाबळेश्वर : वेण्णा लेक येथील मुख्य प्रवेशद्वारावर पर्यटन हंगामात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वेण्णा लेक बायपास मार्गावर रस्ता व कमानी पुलाच्या उभारणीला वन विभागाची मंजुरी मिळाली आहे. मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांच्या प्रयत्नाने या कामातील अडथळा दूर झाला असून, लवकरच कमानी पूल व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.