

Banwadi village where a former ZP member was allegedly assaulted by two individuals.
Sakal
कऱ्हाड : विनाकारण खुन्नसने का बघतोस आणि गावाला व मला वेठीस का धरतोस, असा जाब विचारल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना दोघांनी मारहाण केल्याची घटना बनवडी (ता. कऱ्हाड) येथे काल घडली. याप्रकरणी सागर भीमराव शिवदास यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अख्तरहुसेन आतार व इर्शाद शब्बीर आवटे या दोघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.