फलटण डेपोतील चार कर्मचारी निलंबित; संपात ९० टक्के कर्मचारी सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st worker

फलटण डेपोतील चार कर्मचारी निलंबित; संपात ९० टक्के कर्मचारी सहभागी

सातारा : गेल्या आठवडाभरापासून एस.टी कर्मचाऱ्यांनी संप सुरु केला आहे. या संपाची जिल्ह्यात सर्वप्रथम सुरुवात झालेल्या फलटण डेपोतील चार कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने निलंबन केले आहे. दरम्यान, सोमवारपर्यंत संपाचा तिढा न सुटल्यास सर्व डेपोतील बहुतांश कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शक्यता एस.टी प्रशासनाने वर्तविली आहे.

राज्यभरातील एस.टी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. त्यामुळे, ऐन दिवाळीच्या सण संपवून प्रवासी गावी जाण्याच्या तयारीत असताना सर्व डेपो बंद अवस्थेत दिसत आहेत. या परिस्थितीमुळे प्रवाशांना खासगी वाहनांशिवाय पर्याय नाही. सातारा जिल्ह्यात बंदची हाक आठ नोव्हेंबरला फलटण डेपोतून दिल्याने प्रशासनाने सुरुवातील संबंधित डेपोतील कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

दरम्यान, एस.टी प्रशासनाच्या मुंबई येथील मध्यवर्ती कार्यालयाने निलंबनाच्या कारवाई स्थगित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर डेपोच्या तुलनेत सातारा जिल्ह्यातील अल्प कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. संपाबाबत जिल्ह्यातील विविध संघटनांशीही चर्चा केली आहे. या संपात एस.टी’चे ९० टक्के कर्मचारी सहभागी झाले आहेत. येत्या दोन तीन दिवसात संपावर तोडगा न निघाल्यास मुख्य कार्यालयाकडून निलंबनाची कारवाई तीव्र करण्याच्या सूचना येण्याची शक्यता असल्याचे एस.टी विभागाचे जिल्हा विभाग नियंत्रक सागर पळसुले यांनी सांगितले.

पोलिस आले अन् वाद मिटला

एस.टी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने शहराच्या मध्यवर्ती स्थानकातून एकही बस बाहेर जात नाही. मात्र, शनिवारी एका कंत्राटदाराची शिवशाही बस मेढा या ठिकाणी पार्किंगमध्ये लावून दुसरी शिवशाही पासिंगसाठी आणावयाची होती. मात्र, एस.टी कर्मचारी संघटनेने त्यास विरोध केल्याने तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी मध्यस्थी केल्याने शिवशाही मार्गस्थ झाली.

हेही वाचा: ST STRIKE: विलीनीकरणाची मागणी मान्य होऊ शकत नाही - अनिल परब

शिवशाही आनेवाडीवरुन माघारी

एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एस.टी बस बाहेर काढण्यास प्रशासन धजावत नाही. मात्र, शुक्रवारी शिवशाही परळ डेपोतून मध्यरात्रीच्या सुमारास साताऱ्याच्या दिशेने रवाना झाली. ही बस पोलिस बंदोबस्तात येत होती. मात्र, जिल्ह्यातील एस.टी संघटनेचे कर्मचारी आक्रमक झाल्याचे समजताच अनुचित प्रकार टाळण्यासाठी शिवशाही आनेवाडी टोलनाक्यावरुन पुन्हा परळ डेपोकडे फिरविल्याची घटना घडली.

loading image
go to top