Delwadi’s Shelar — From sugarcane cutting fields to becoming an Executive Engineer, an inspiring success story.
sakal
सातारा
Success Story:'ऊसतोड करणाऱ्या युवकाची कार्यकारी अभियंतापदाला गवसणी'; देलवडीतील शेलार यांचे यश: पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण केलेला घरकुल प्रकल्प ठरला मैलाचा दगड
Inspiring Transformation: प्रामाणिकपणे काम करत पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर मजल मारली आहे. लवकरच त्यांना अधीक्षक अभियंतापद मिळणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये लोकार्पण केलेली २८५८ घरकुले बांधणे हा प्रकल्प शेलार यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.
खुटबाव: देलवडी (ता. दौंड) येथील भाऊसाहेब शेलार यांनी शालेय जीवनामध्ये ऊस तोडणी व उसाची लागण करत शिक्षण घेतले. कंदील व दिव्याच्या उजेडावर अभ्यास केला. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत कनिष्ठ अभियंतापद मिळवले. प्रामाणिकपणे काम करत पुणे महानगरपालिकेमध्ये कार्यकारी अभियंतापदावर मजल मारली आहे. लवकरच त्यांना अधीक्षक अभियंतापद मिळणार आहे. पुणे येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२३ मध्ये लोकार्पण केलेली २८५८ घरकुले बांधणे हा प्रकल्प शेलार यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरला.