satara corona update : कोरोना निवारणासाठी ११२ कोटींचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fund
सातारा : कोरोना निवारणासाठी ११२ कोटींचा निधी

सातारा : कोरोना निवारणासाठी ११२ कोटींचा निधी

सातारा : सध्या जिल्ह्याचा कोरोना(satara corona update) पॉझिटिव्‍हिटी रेट १८.४१ टक्क्यांवर पोचला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन निर्बंध अधिक कडक करण्याच्या तयारीत आहे. रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा नियोजन समितीतून (district palnning committee)तब्बल ११२ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. या निधीतून औषधे व पायाभूत सुविधा, तसेच रुग्णालयांतील इलेक्ट्रिकलची कामे करण्यासाठी वापर केला जाणार आहे. त्यामुळे शासनाच्या एक पाऊल पुढे राहत जिल्हा नियोजन समितीने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे.

हेही वाचा: मुंबई : 598 निवासी डॉक्टरांना कोरोनाची बाधा

जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेवेळी सर्वाधिक निधी नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना निवारणासाठी खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आरोग्यासंदर्भात पायाभूत सुविधा उभ्या राहिल्या आहेत. त्यामध्ये जम्‍बो कोविड हॉस्पिटल, काशीळ येथील कोरोना हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालयातील वाढीव आयसीयू सेंटर, ऑक्सिजन प्लान्ट आदींचा समावेश आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ३० टक्के निधी कोरोना निवारणासाठी वापरण्याची सूचना होती. त्यानुसार निधीचा वापर झाला आहे. सध्या जिल्ह्यातील जनता कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. यावेळेस दोन डोस घेतलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास सौम्य लक्षणे जाणवत असल्याने गृहविलगीकरणावरच आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यामुळे केवळ ४० टक्के बाधित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. त्यामध्ये बहुतांश रुग्ण हे जिल्हा रुग्णालयातील आयसीयू व कोरोना वॉर्डमध्ये दाखल केलेले आहेत.

सध्या कोरोनाबाधितांचा(corona update) आकडा दररोज ९८१ पर्यंत पोचला आहे. मागील दोन लाटांवेळी एक हजार रुग्णसंख्या झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने लॉकडाउन जाहीर केले होते. मात्र, यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन(pm modi ) न करण्याचा निर्णय जाहीर केलेला असल्याने सध्या निर्बंधांच्या माध्यमातून दैनंदिन व्यवहार सुरू ठेवण्यात आले आहेत. पण, बाधितांची संख्या वाढल्यास आणखी कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे. रुग्णांना उपचार व औषधे मिळावीत, यासाठी पायाभूत सुविधा उभी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध केला जाणार आहे. ‘नियोजन’चा यावर्षीचा आराखडा ३७५ कोटींचा असून या आराखड्याच्या ३० टक्के म्हणजेच ११२ कोटींचा निधी हा कोरोना निवारणासाठी करायच्या उपाययोजनांवर खर्च केला जाणार आहे. त्यातून रुग्णाला आवश्यक औषधे, पायाभूत सुविधा, रुग्णालयात(hospitals) उपलब्ध करायची यंत्रणा आणि साहित्य आदींवर हा निधी खर्च केला जाईल.शासनाकडून गेल्या दोन लाटांत केवळ २५ कोटींचा निधी उपलब्ध झाला होता. नियोजन समितीतून ११२ कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शासनाच्या पुढे एक पाऊल टाकत नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना निवारणांच्या उपाययोजना होणार आहेत.

हेही वाचा: लसीकरण झालेल्या 'डॉक्टरांना' कोरोनाची बाधा

कोरोनासाठी सध्या मागणी केलेला निधी -७० कोटी

नियोजन समितीतून - ११२ कोटी

दिला जाणारा निधी - २५ कोट

Web Title: Fund Of Rs 112 Crore For Corona Rehabilitation In Satara District Palnning Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top