गणेवाडीकरांना मरणयातना अजून किती दिवस भोगाव्या लागणार?

गणेवाडीकरांना मरणयातना अजून किती दिवस भोगाव्या लागणार?

मल्हारपेठ (जि. सातारा) : कोरोनाच्या विळख्याचा दुर्गम गणेवाडीच्या रस्त्याच्या कामाला "ब्रेक' लागला आहे. राज्य सरकाने मंजूर कामांचा निधी थांबविल्याने हा रस्ता पूर्णत्वाकडे जाणार का? दुर्गम गणेवाडीकरांना मरणयातना अजून किती दिवस भोगाव्या लागणार, अशी चर्चा विभागातून होत आहे. 

स्वातंत्र्य काळापासून गणेवाडी गाव दळणवळणापासून कोसो दूर आहे. अर्थसंकल्पातून तत्कालीन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या पुढाकाराने गणेवाडीच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला. मात्र, त्यानंतर आमदार शंभूराज देसाई झाले. या वेळी कामाची दोन दोन वेळा भूमिपूजन झाले. मात्र, काम काही पूर्ण झाले नाही. यानंतर माजी मंत्री पाटणकर यांच्याच प्रयत्नामुळे डोंगरी विकास निधीतून पठारापासून गणेवाडीपर्यंतचे फक्त खडीकरण झाले. यानंतर राज्यात पुन्हा युतीचे सरकार स्थापन झाले. मात्र, मार्गावरून जाणाऱ्या रस्त्यावर वन विभागाची हद्द येत असल्याने तब्बल पाच वर्षे रस्ता वन विभागाच्या परवानगीच्या कचाट्यात अडकला होता. 

मात्र, शंभूराज देसाई यांनी विधानसभेत आवाज उठवून डोंगरपठारावरील गावाच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागावा व वन विभागानेही गावे बारमाही रस्त्याने जोडावी म्हणून परवानगी द्यावी, अशी लक्षवेधी मांडली. त्यावेळी तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने आदेश देवून वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यास परवानगी दिल्याने ताबडतोब निधीची तरतूद झाली. मात्र, तेव्हापासून आत्तापर्यंत काम 20 टक्के झाले आहे. पावसाळ्यात डोंगरातून येणाऱ्या पाण्यास नाल्यांची व्यवस्था नसल्याने भराव वाहून गेल्याने ठिकठिकाणी रस्ता खचला आहे. आता कोरोनामुळे निधीला ब्रेक लागल्याने दुर्गम गणेवाडीकरांचा वनवास कधी संपणार? असा सूर विभागातून उमटत आहे. 

गणेवाडी रस्त्यासाठी लोकवर्गणीतून आम्ही आत्तापर्यंत अंदाजे दोन लाख रुपये खर्च केला. आता कामाला गती मिळायला पाहिजे होती. मात्र, कोरोनाचे संकट दूर होवून रस्ता व्हावा म्हणून आम्ही त्र्यंबकेश्वराला सामुदायिक साकडे घालणार आहोत. 

-गणेश कदम, उपाध्यक्ष, विकास सोसायटी, गणेवाडी 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com