लोणंदच्या विकासासाठी कॉंग्रेसला एकहाती सत्ता द्या; पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन

ज्यांना कोणाला काँग्रेस बरोबर यायचे आहेत्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढावे.
satara
satarasakal
Updated on

लोणंद : लोणंद शहराच्या विकासासाठी कॉंग्रेसला एक हती सत्ता देण्याचे आवहान राज्याचे माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. लोणंद नगरपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर येथील राधेशाम पॅलेस मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेंद्र डोईफोडे, खंडाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष सर्फराज बागवान, खंडाळा तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शैलजा खरात, दादासाहेब शेळके - पाटील, सोपानराव क्षीरसागर, दत्तात्रय खरात, म्हस्कूअण्णा शेळके - पाटील, अॅ. हेमंत खरात, रमेश कर्नवर,अॅड.बबलूभाई मणेर, इम्रान बागवान, प्रविण डोईफोडे,इकबाल बागवान,आदी प्रमुख उपस्थीत होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, यावेळी स्व. अॅड. बाळासाहेब बागवान यांच्याशिवाय नगरपंचायतीची निवडणूक होत आहे. ज्यांना कोणाला काँग्रेस बरोबर यायचे आहेत्यांनी कॉंग्रेसच्या चिन्हावर लढावे.

satara
'राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हितासाठी सच्चा कार्यकर्त्याला अध्यक्षपद द्या'

राज्यासह सर्वत्रच कॉंग्रेसला चांगले वातावरण आहे.यासाठी लोणंद नगरपंचायतीची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार असून तसा नारा देत त्यांनी सर्वच्या सर्व १७ जागांवर ताकदीचे व सुशिक्षित तसेच जनमानसात चांगले स्थान आसणारे उमेदवार द्यावेत.तशी तयारी करावी. काहीही झाले तरी भाजपला रोखायचे आहे. त्यासाठी कोणाशीही स्थानिक आघाडी केली जाणार नाही. खंडाळा कारखाण्याच्या बाबतीत विश्वासघात झाल्याने निवडणूकीत विश्वासघात व सभासदांची दिशाभूल करणाऱ्यांना दूर ठेवण्यासाठी काही निर्णय घ्यावा लागला होता. तो निर्णय कॉंग्रेसच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी पाळल्याने जे अपेक्षीत होते ते घडले मात्र तो निर्णय त्या निवडणूकीपुरताच होता.आता मात्र कोणाशी स्थानिक आघाडी होणार नाही. स्व. अॅड. बाळासाहेब बागवान यांनी लोणंद नगरीचे पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी कॉंग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्यांनी ही निवडणूक हातात घेवून काँग्रेसची एकहाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत तरच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. असेही यावेळी त्यांनी सांगितले.

सर्फराज बागवान म्हणाले, माझे वडिल स्व. अॅड.बाळासाहेब बागवान यांचे स्वप्न पूर्ण करणण्यासाठी लोणंद नगरपंचायतीची ही निवडणूक स्वबळावर लढवण्याची तयारी केली.२४ बाय सात नळपाणीपुरवठा योजना,अंडरग्राउंड स्टीट लाईट, मुलींना दत्तक मार्गी लावून शहराचा कायापालट करण्याचा संकल्प केला आहे.

satara
आरे-वारेला CRZ चा खो; प्रकल्प होणारच, शिक्षणमंत्र्यांचा संकल्प

दादासाहेब शेळके म्हणाले,लोणंद नगरपंचायतीची सत्ता आणून स्व. अॅड.बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहाण्याचा सर्व कॉंग्रेस कार्यकार्यांनी संकल्प सोडला आहे.सर्वच्या सर्व १७ जागा लढण्याची तयारी केली आहे. निसार आतार म्हणाले, स्व. अॅड.बाळासाहेब बागवान आमच्यात नाहीत हे म्हणणे चुकीचे आहे.ते आमच्यात आहेत, त्यांचा विचार आमच्या प्रत्येकाच्या ठायी आहे. म्हणूनच नगरपंचायतीत कॉंग्रेसची निर्विवाद सत्ता आणण्यासाठी जीवाचे रान करु.

म्हस्कूअण्णा शेळके - पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. तारिक बागवान यांनी सुत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com