FasTag स्कॅन हाेत नाहीये, थांबा! टाेलचे पैसे देऊ नका; हे वाचा

FasTag स्कॅन हाेत नाहीये, थांबा! टाेलचे पैसे देऊ नका; हे वाचा

सातारा : हो नाही.. हो नाही.. म्हणता सुमारे 15 दिवसांपुर्वी पासून टोल नाक्‍यांवर इलेक्‍ट्रानिक्‍स टोल वसुली सुरु झाली आहे. यामुळे टोल नाक्‍यावरील भ्रष्टाचार बंद होईल अशी आशा निर्माण झाली आहे. तसेच टोल नाक्‍यांवरील लागणा-या लांबच्या लांब रांगा लागणार नाहीत असे आशादायक चित्र पाहवयास मिळणार असा ही दावा केला गेला. दरम्यान राज्यातील विशेषतः पश्‍चिम महाराष्ट्रातील काही टोल नाक्‍यांवर बॅलेन्स असूनही फास्टॅग (FasTag) स्कॅन होण्यास अडचणी येत असल्याचे घटना घडा आहेत. परिणामी टोल नाक्‍यांवरील कर्मचारी वाहनधारकांकडून दुप्पट टोल आकारत आहे अथवा वादावादीचे प्रसंग घडत आहेत. 

पुणे जिल्ह्यातील एका टोल नाक्‍यावरील एसटी महामंडळाच्या वाहकाचा आणि टोल कर्मचा-याचा सुरु असलेला संवाद आणि त्यातून मी कसा खरा हा प्रसंग सध्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये बसला फास्टॅगचे कार्ड असूनही स्कॅनच होत नसल्याने संबंधितास पैसे द्यावे लागतील असे सांगत आहे. तर बसचा वाहक फास्टॅग कार्ड महामंडळाने बसविलेआहे. तुम्ही स्कॅन करा असे सांगत आहे. तुमचं हे रोजचे आहे असेही वाहक सांगत आहे.

तुमच्या आमदारांना सांगा अधिवेशनात मराठा आरक्षणावर बोलायला
 
सातारा येथील आनेवाडी आणि क-हाड नजीकच्या तासवडे येथील टोल नाक्‍यावर देखील असे प्रसंग घडत आहेत. यातून वादावादीचे प्रसंग घडत आहेत. गेल्या 15 दिवसांत काही वाहनचालकांना रात्री अपरात्रीही स्कॅन होत नाही त्यामुळे पैसे द्या अशी टोल कर्मचा-यांकडून मागणी करण्यात आली. त्यावेळी काहींनी पैसे देऊन पुढचा प्रवास केला. त्यातील काहींना थोडे अंतर कापल्यानंतर टॅगचे पैसे खात्यातून कापल्याचा बॅंकेचा संदेश आल्याने गोंधळ उडाला. आपल्याकडून दुप्पट पैसे घेतल्याने टोल व्यवस्थापनास दूस-या दिवशी विचारणा केल्यानंतर पैसे रिफंड देण्यात आल्याचा अनुभवही काहींनी सांगितला. दरम्यान काही वाहनधारकांनी टोल नाक्‍यावर काही समस्या आल्यास मदत किंवा तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध आहेत असे बोर्ड वाचून संपर्क साधला. परंतु बहुतांश वेळा संबंधित क्रमांकावर संपर्क केला तर आमचे सर्व एक्‍झिक्‍यूटिव्ह अन्य कॉलवर व्यस्त आहेत, ते लवकरच आपल्याशी संपर्क करतील, एवढे ऐकायला मिळते, ते देखील प्रदीर्घ कालावाधीसाठी म्हणजे जवळपास अर्धा तासापेक्षा अधिक असा अनुभव आल्याचे सांगितले. सातारा जिल्हावासियांनाे! जाणून घ्या 23 केंद्र जेथे मिळेल तुम्हाला कोरोनावरील लस 

गडकरी साहेबांनाच पाठवितो

तळेगाव दाभाडे येथे शिवनेरी (एमएच 06 एस 9503) बसमधील प्रवाशांना एक अनुभव आला. आमची गाडी दहा ते 15 मिनीट जागेवरच उभी हाेती. यामध्ये वाहक टाेल कर्मचा-यास  मॅनेजरला बोलवा. मॅनेजरला बोलवा. टॅग होत नाही. टॅग का करत नाही. पैसे आहे सर्व आहे. माझे काम आहे का. कशाला छळवणूक करता. आम्ही लावलेले आहेत का टॅग असे म्हणत हाेता. तर टॅगला प्रॉब्लेम येत आहे असे तेथील कर्मचारी सांगत हाेता. एसटी महामंडळाने पैसे भरले आहेत. स्कॅनींगचे काम करण्याचे तुमचे आहे माझे नाही आहे असा मुद्दा वाहकाने मांडला. तर टॅग बदलून घ्या असे कर्मचारी सांगत हाेता. यावेळी वाहक व्हिडिआे काढत हाेताे ताे Nitin Gadkari यांना पाठविताे असेही म्हणाला. या वादात आमच्या सारख्या प्रवाशांना केवळ बघ्याची भुमिका घेत गाडी कधी पूढे जाणार याची प्रतिक्षा करावी लागली. अखेर टॅग स्कॅन झाला आणि सुमारे 20 मिनीटानंतर आम्ही मार्गस्थ झालाे. 

यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत 

कोल्हापूरच्या विभाग नियंत्रकांचे आगार व्यवस्थापकांना पत्र

राज्य परिवहन विभाग कोल्हापूरचे विभाग नियंत्रकांनी कोल्हापूर विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांना काही दिवसांपुर्वी एक पत्र पाठविले. या पत्रात काही वेळेस एखाद्या पथकर नाक्‍यावर (टोल नाका) तांत्रिक अडचण उदभवल्यास राज्य परिवहन वाहनांचे ई टॅग कार्यन्वित असून देखील रीड होत नाहीत. त्यामुळे या पथकर नाक्‍यांवर संबंधित पथकर कर्मचा-यांकडून राज्य परिवहन विभागाच्या वाहनास ई टॅग असून देखील दुप्पट पथकर शुल्क वसूल केले जात आहे. त्यामुळे महामंडळाचे आर्थिक नुकसान होत आहे.

भारत सरकारचे सात मे 2018 चे राजपत्र नूसार वाहनचा ई टॅग कार्यान्वित असून तसेच ई - टॅग खात्यावर पुरेशी रक्कम जमा असून देखील पथकर नाक्‍यावर इलेक्‍ट्रॉनिक पथकर तांत्रिक अडचणींमुळे ई टॅग रिड होत नसेल तर वाहनधारकास कोणत्याही प्रकारचे पथकर शुल्क अदा न करता पथकर नाक्‍यावरुन जाण्याची अनुमती देण्यात आलेली आहे. दरम्यान या राजपत्राचे छायाचित्र मोबाईलवर संकलित करुन आवश्‍यकता भासल्यास पथकर नाक्‍यावर संबंधिताच्या निदर्शनास आणून द्यावे अशी सूचना करण्यात आली आहे. 

राजपत्रात काय आहे नमूद

केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग कार्यालयाने सात मे 2018 कालावधीत एका राजपत्र काढले आहे. यामध्ये वाहनाचा टॅग कार्यान्वित असूनही तसेच खात्यावर रक्कम असून देखील टाेल नाक्‍यावरील तांत्रिक अडचणींमुळे टॅगचे वाचन झाले नाही तरी संबंधित वाहनधारकाकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क घेऊ नयेत, त्यास प्रवाशाची परवानगी द्यावी असे नमूद केले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com