
Farmers in Satara to benefit from Shivarfari road survey; each farm to get rightful road access.
Sakal
सातारा: शासनाच्या सेवा पंधरवड्यात जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात पाणंद रस्ते खुले करण्याचे अभियान महसूल प्रशासनाने हाती घेतले आहे. या पाणंद रस्त्यावरील अतिक्रमणे हटवून त्यांचे मजबुतीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांचे जीपीएसवर मॅपिंग करून त्याला संकेतांक दिला जाणार आहे, तसेच त्याचे गाव नकाशात आरेखन होणार आहे. जिल्ह्यातील १०२ मंडलांतील १०३ गावांतील ३८६ पाणंद रस्त्यांचे काम सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक मंडलातील एकेक गाव घेऊन हे काम सुरू झाले आहे. त्यामुळे यापुढे कोणीही शेताकडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण करू शकणार नाही. शेतापर्यंत जाणारा रस्ता सुलभ झाल्यास वाहतुकीत सुलभता येऊन वेळ आणि पैशाची बचत होणार असून, शेती यांत्रिकीकरण, आधुनिकीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे.