Shambhuraj Desai : रुग्णालयात औषधं न मिळाल्‍यास थेट जिल्‍हाधिकाऱ्यांना फोन करा; पालकमंत्र्यांचं नागरिकांना आवाहन

प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रातील औषधसाठ्याची माहिती ॲपवर अद्ययावत करण्‍यात येणार आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Summary

जिल्हा रुग्णालयाच्‍या अद्यावतीकरण, तसेच सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी सहा कोटींचा निधी दिला आहे.

सातारा : शासकीय रुग्णालयांमध्ये (Government Hospital) उपचार घेणाऱ्या रुग्‍णांना दर्जेदार, गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळणे आवश्‍‍यक आहे. प्रत्‍येक ग्रामीण रुग्‍णालयांत सहा महिने पुरेल इतका औषधसाठा (Medicine) करण्‍याच्‍या सूचना केल्‍या असून, त्‍यासाठी जिल्‍हा नियोजनमधून निधी देणार असल्‍याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

याचवेळी त्‍यांनी ग्रामीण रुग्‍णालयाच्‍या कारभारावर नियंत्रणासाठी प्रांताधिकाऱ्यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती नेमणार असून, औषधे मिळत नसल्‍यास थेट जिल्‍हाधिकाऱ्यांना फोन करण्‍याचे आवाहनही नागरिकांना देसाई यांनी या वेळी केले.

Shambhuraj Desai
धमक असेल तर हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्यांसोबतची आघाडी तोडून दाखवा; बावनकुळेंचं शरद पवारांसह ठाकरे, पटोलेंना चॅलेंज

नांदेड, छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्‍णालयांतील‍ मृत्‍युसंख्‍येनंतर प्रत्‍येक जिल्‍ह्यातील आरोग्‍य सुविधांचा आढावा घेण्‍याच्‍या सूचना मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्‍या होत्‍या. यानुसार श्री. देसाई यांनी सातारा येथील जिल्‍हा शासकीय रुग्‍णालयास भेट देत औषधसाठ्याची पाहणी केली.

या वेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रवींद्रनाथ चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे उपस्‍थित होते. यानंतर जिल्‍हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. देसाई बोलत होते.

Shambhuraj Desai
Hasan Mushrif : मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यात 'त्या' माणसाची अडचण असेल, तर माझा नाईलाज आहे; मुश्रीफांचा कोणावर रोख?

ते म्‍हणाले, ‘‘जिल्‍हा रुग्‍णालयास भेट देऊन त्‍याठिकाणच्‍या औषधसाठ्याची पाहणी केली. येथील औषधसाठा दोन महिने पुरेल इतका असून, उर्वरित उपजिल्‍हा आणि ग्रामीण रुग्‍णालयातही तेवढाच औषधसाठा आहे. हा औषधसाठा किमान सहा महिने पुरेल इतका असणे आवश्‍‍यक असल्‍याने त्‍यासाठी जिल्‍हा नियोजनमधून ११ कोटी रुपये देण्‍यात आले आहेत. यातून स्‍थानिक पातळीवर आवश्‍‍यक औषध खरेदी करण्‍याच्‍या सूचना केल्‍या आहेत.’’

Shambhuraj Desai
Almatti Dam : 'आलमट्टी'ची उंची वाढल्यास पश्‍चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका; कर्नाटक सरकारच्या 'त्या' निर्णयाला तीव्र विरोध

प्रत्‍येक आरोग्‍य केंद्रातील औषधसाठ्याची माहिती ॲपवर अद्ययावत करण्‍यात येणार असून, मागणीनुसार औषधे, साधनसामग्री देखील संबंधित ठिकाणी देण्‍यात येईल. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या नियुक्तीच्या ठिकाणी थांबणे गरजेचे असून, जिल्हाधिकाऱ्यांची यंत्रणा रुग्णालयांना भेटी देऊन त्‍याची तपासणी करेल. कामाच्‍या ठिकाणी गैरहजर राहणाऱ्यांवर कारवाई करण्‍याचे संकेतही या वेळी श्री. देसाई यांना दिले.

Shambhuraj Desai
विषारी समजणाऱ्या रुईच्या झाडापासून बनवलं 'या' आजारावर औषध; प्रा. सुमेधा बनेंना मिळालं भारत सरकारकडून 'पेटंट'

जिल्हा रुग्णालयाच्‍या अद्यावतीकरण, तसेच सांडपाणी व्‍यवस्‍थापनासाठी सहा कोटींचा निधी दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. काही ठिकाणी रुग्‍णांना आवश्‍‍यक औषधे मिळत नसल्‍याचा प्रश्‍‍न उपस्‍थित केल्‍यानंतर श्री. देसाई यांनी असा प्रकार कोठेही होत नसल्‍याचे सांगितले. यावर काशीळ येथे अजूनही तसाच प्रकार सुरू असल्‍याचे सांगताच श्री. देसाई यांनी असा प्रकार कोठे आढळल्‍यास त्‍याची माहिती नागरिकांनी फोनद्वारे थेट जिल्‍हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्‍याचे आवाहन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com