
-स्वप्नील शिंदे
सातारा : रोजगार हमी योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यातील अनेक अकुशल मजुरांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रोजगार हमी कक्षाकडून लाखो रुपये बोगस लाभार्थ्यांच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने जमा करण्यात आले आहेत. या मजुरांनी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली आहे; परंतु त्यांच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे.