sambhjraj desai Sakal
सातारा
Shambhuraj Desai: मनोज जरांगेंशी समोरासमोर चर्चेची शासनाची तयारी: मंत्री शंभूराज देसाई; मराठा समाजाचे एकनाथ शिंदेंकडून बरेच प्रश्न मार्गी
Maratha Reservation Row: मराठा आरक्षणासंदर्भात मंत्री देसाई यांनी आज येथे माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे- पाटील यांची बोलण्याची शैली ग्रामीण बाज असलेली आहे. त्यामुळे बोलण्याच्या ओघात त्यांना तसे बोलायचे नसताना ते बोलून गेले. त्यांच्या हे लक्षात आले, त्या वेळी त्यांनी माफीही मागितली.
कऱ्हाड: मराठा समाजाचे बरेच प्रश्न एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना व युती सरकारने सोडविले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ज्या गोष्टी प्रलंबित आहेत, जी आश्वासने सरकारने दिली होती, त्यात काय अडचणी आहेत, याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांची समोरासमोर संबंधित विभागाचे अधिकारी, कायदेतज्ज्ञ, ज्येष्ठ विधिज्ञ यांच्यासोबत मनोज जरांगे-पाटील यांच्याशी चर्चा करण्याची केव्हाही तयारी आहे, अशी स्पष्टोक्ती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी आज केली.

