

Wedding Bells After Ballot: Vikram Patil’s Act Wins Hearts
esakal
-हेमंत पवार
कराड : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवारी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानास सुरुवात झाली. तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीमुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या मतदानाच्या दिवशी कराड तालुक्यातील तांबवे येथील एका नवरदेवाने लग्नाच्या गडबडीतही मतदानाचा हक्क बजावून सामाजिक बांधिलकीचे उदाहरण घालून दिले. त्यामुळे या घटनेची राजकीय व सामाजिक वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.