शिल्लक बेडच्या माहितीसाठी ऍप विकसीत करा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

उमेश बांबरे
Friday, 4 September 2020

या वेळी कोविड रुग्णालयातील सुविधांबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर दिली. बैठकीनंतर मान्यवरांनी कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली.

सातारा : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांत मोठी वाढ होत आहे. कुठलाही रुग्ण बेडपासून वंचित राहू नये, यासाठी कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत, याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी ऍप तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी प्रशासनास केली आहे.
 
कोरोना संसर्गाबाबतच्या उपाययोजनांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्या वेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार जयकुमार गोरे, दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

सातारकरांनाे... हीच ती वेळ; बेफिकीरी नको

श्री. पाटील म्हणाले, ""छत्रपती शिवाजी संग्रालयात 250 बेडचे कोविड रुग्णालय उभारण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे रुग्णालय लवकरात लवकर उपचारासाठी वापरात येईल, यासाठी कामाचे नियोजन करा. प्रत्येक तालुकानिहाय कोरोना रुग्णांची संख्या संबंधित तालुक्‍यांच्या लोकप्रतिनिधींना द्या.''

यूकेचे पंतप्रधान करु शकतात मग माेदी का नाही? पृथ्वीराज चव्हाण

श्रीनिवास पाटील म्हणाले, ""जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी निवृत्त डॉक्‍टरांची मदत घ्यावी. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरातच उपचार घेण्यासाठी प्रवृत्त करावे.'' जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या बेडची माहिती प्रत्येक तालुक्‍याच्या आमदारांना द्यावी. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांना बेडची माहिती ऑनलाइन पद्धतीने व्हावी, यासाठी कक्ष स्थापन करावा, अशा सूचना आमदार गोरेंनी केल्या. फलटण तालुक्‍यासाठी आमदार फंडातून व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्यावेत, असे दीपक चव्हाण यांनी सांगितले. या वेळी कोविड रुग्णालयातील सुविधांबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी सादर दिली. बैठकीनंतर मान्यवरांनी कोविड रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. 

ऑक्‍सिजन ग्रुप...कोरोनाग्रस्तांसाठी संजीवनी, कऱ्हाडला घरोघरी देतात उपचारासाठी मोफत यंत्रे

कोरोनाचा संसर्ग नसलेल्या रुग्णांना काही रुग्णालयांत उपचार केले जात नाहीत. त्यांना उपचार मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. साताऱ्यातील कोविड रुग्णालय येत्या तीन आठवड्यांत सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना शंभूराज देसाई, (गृह राज्यमंत्री) यांनी केली.

भिवा भदाणेचा तेरावा

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Balasaheb Patil Suggests To Develop App Information Vacant Bed In Satara