नकारात्मकतेतून सकारात्मकतेसाठी सुफिया खानची सहा हजार किलोमीटरची सद्‌भावना दौड

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 24 January 2021

सुफिया यांच्याबरोबर 25 जणांनी खोडशी ते नांदलापूर असे अंतर धावत जाऊन साथ दिली. त्यानंतर त्या कोल्हापूरला रवाना झाल्या.

कऱ्हाड ः कोरोनाकाळात लोकांच्या मनात नकारात्मक भाव निर्माण झाले आहेत, त्याचे सकारात्मकतेत रूपांतर व्हावे, या प्रेरणेतून भारत सद्‌भावना दौड करत आहे, असे मत गिनीस बुकमध्ये विक्रम नोंदवलेल्या राजस्थानच्या विख्यात धावपटू सुफिया खान (Sufiya Khan) यांनी व्यक्त केले.
 
दिल्ली ते मुंबई ते बंगळूर ते चेन्नई ते कोलकता व पुन्हा दिल्ली अशी सहा हजार किलोमीटरची सद्‌भावना दौड सुफिया करत आहे. यानिमित्त तिचे येथे आगमन झाले असता कऱ्हाड जिमखान्यातर्फे तिचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी तिचा नागरी सत्कारही झाला. त्या वेळी ती बोलत होती. जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्रकुमार शहा, सचिव सुधीर एकांडे, विवेक ढापरे, सौ. सुचिता शहा, विवेक कुंभार, सचिन गरुड, प्रमोद गरगटे, अभिजित घाटगे, दीपक शहा, शंकर चव्हाण, डॉ. चिन्मय विंगकर उपस्थित होते.

शिक्षक संघटना मूग गिळून गप्प?
 
श्री. ढापरे यांनी जिमखान्याच्या कार्याचा परिचय करून दिला. सुफिया दररोज 55 किलोमीटर धावतात. त्या 135 दिवसांत अंतर पूर्ण करणार आहेत. त्यांचे पती विकास सायकलपटू आहेत. त्यांनी दौडीचे नियोजन केले आहे. या वेळी सुफिया यांनी सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिली. डॉ. विंगकर यांनी प्रास्ताविक केले. अभिजित घाटगे यांनी आभार मानले. जिमखान्याचे सदस्य श्री. घाटगे व अन्य 25 जणांनी सुफिया यांच्याबरोबर खोडशी ते नांदलापूर असे अंतर धावत जाऊन साथ दिली. त्या कोल्हापूरला रवाना झाल्या.

इंडिया गेट ते गेटवे ऑफ इंडिया अंतर 29 दिवसांत पुर्ण करणा-या सुफियाची आज अजिंक्यता-याला गवसणी

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guinness World Record Holder Sufiya Khan Karad Delhi Kolkata Delhi Mission Satara Marathi News