उंब्रजला प्लॅस्टिकच्या कचऱ्याने गटारे तुंबली; नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात!

संतोष चव्हाण
Saturday, 17 October 2020

सेवारस्त्याच्या दुतर्फा वाहणारे पाणी पाटण तिकाटणे येथे असणाऱ्या भराव पुलाखालून जाणाऱ्या नाल्यातून वाहते. परंतु, या नाल्यात वाहत येणारा कचरा अडकत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे संबंधित विभाग या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. या गटारामध्ये मृत जनावर अडकले असल्याचे जाणवू लागले असून, दुर्गंधी पसरली आहे. याच सेवारस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून नागरिकांना जावे लागत आहे.

उंब्रज (जि. सातारा) : येथील सेवारस्स्त्यालगत असणारी गटारे प्लॅस्टिकच्या कचऱ्याने तुंबली असून, गटाराचे पाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांना या गटाराच्या पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. याकडे महामार्ग विभागाचे दुर्लक्ष असल्यामुळे नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. 

उंब्रज येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा सेवारस्त्यालगत नाले काढण्यात आले आहेत. या सेवारस्त्यावर दुतर्फा व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटलेली आहेत. संबंधित दुकानदार आपल्या दुकानांतील केरकचरा सेवारस्त्यालगत असणाऱ्या नाल्यांमध्ये टाकत आहेत. यामुळे असणारी गटारे या कचऱ्यामुळे तुंबली आहेत. तसेच या नाल्यांतून वाहणारे पाणी सेवारस्त्यावर वाहत आहे. यामुळे सेवारस्ता आहे की गटार हेच कळत नसल्याचे चित्र आहे. गटारे रस्त्यावरून वाहण्याची समस्या नित्याची झाली आहे. या बाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. परंतु, याकडे महामार्ग देखभाल दुरुस्ती विभाग दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. 

स्वाभिमानीने घातला दहावा; जिल्हा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी

सेवारस्त्याच्या दुतर्फा वाहणारे पाणी पाटण तिकाटणे येथे असणाऱ्या भराव पुलाखालून जाणाऱ्या नाल्यातून वाहते. परंतु, या नाल्यात वाहत येणारा कचरा अडकत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे संबंधित विभाग या मुख्य समस्येकडे दुर्लक्ष करीत आहे. या गटारामध्ये मृत जनावर अडकले असल्याचे जाणवू लागले असून, दुर्गंधी पसरली आहे. याच सेवारस्त्यावरून वाहणाऱ्या पाण्यातून नागरिकांना जावे लागत आहे. 

अजगराच्या दहशतीने शेतकरी भयभीत; वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव

तर सेवारस्त्याच्या दुतर्फा असणारे दुकानदार आपला कचरा सेवारस्त्यालगत असणाऱ्या नाल्यांमध्ये टाकत असल्याने नाले तुंबत आहेत. याबाबत ग्रामपंचायत प्रशासन कोणतीच कारवाई करत नसल्याने संबंधित दुकानदार नाल्यामध्ये कचरा टाकत आहेत. तर सेवारस्त्याच्या कडेला असलेले चिकन, मटण दुकानदार शिल्लक मलबा या नाल्यात टाकत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. एक महिन्यापासून सेवारस्त्याचे नाले तुंबले असून, गटाराचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याकडे महामार्ग देखभाल दुरुस्ती विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांतून केला जात आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Health Of The Citizens Of Umbraj Is In Danger Satara News