
भुईंज: पुणे- बंगळूर महामार्गावर कामोठे ते विटा रक्कम घेऊन जाणाऱ्या सोने व्यापाऱ्याला शनिवारी (ता. १२) वेळे येथे दरोडा टाकून लुटले होते. यामध्ये तिघांना मारहाण करून त्यांच्याकडील सुमारे २० लाख रुपये लंपास केले होते. याप्रकरणी सात जणांना भुईंज व सातारा गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केरळ राज्यात ताब्यात घेतले आहे.