Satara : निवडणुकीच्या तोंडावर पालिकेस पुरस्‍कार कसा मिळाला; अमोल मोहिते यांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

"निवडणुकीच्या तोंडावर पालिकेस पुरस्‍कार कसा मिळाला"
Satara : निवडणुकीच्या तोंडावर पालिकेस पुरस्‍कार कसा मिळाला; अमोल मोहिते यांचा आरोप

"निवडणुकीच्या तोंडावर पालिकेस पुरस्‍कार कसा मिळाला"

सातारा : सातारा पालिकेस स्‍वच्‍छ भारत मिशन अंतर्गत मिळालेला पुरस्‍कार हा गुगल मॅपवर फोटो आणि फॉर्म टाकून मिळाला आहे. आजही शहराच्‍या विविध भागांत कचऱ्याचे ढीग पडलेले आपल्‍याला दिसतील. हा पुरस्‍कार यावर्षीच का मिळाला, याचा अभ्‍यास करणे आवश्‍‍यक आहे. यापूर्वीचे पुरस्‍कार समितीने प्रत्‍यक्ष येऊन पाहणी केल्‍यानंतर मिळाले आहेत. मात्र, हा पुरस्‍कार गुगल मॅपवर फोटो पाठवून आणि फॉर्म भरून मिळालेला आहे. याचे सर्व श्रेय मुख्‍याधिकारी अभिजित बापट यांचे असल्‍याची टीका नविआचे नगरसेवक अमोल मोहिते यांनी आज केली.

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

या वेळी नविआचे नगरसेवक अशोक मोने, अविनाश कदम, शकील बागवान, लीना गोरे, राजू गोरे आदी उपस्‍थित होते. या वेळी मोहिते म्‍हणाले, ‘‘यापूर्वी प्रत्‍येक अभियानावेळी समिती येऊन प्रत्‍यक्ष पाहणी करत होती. यंदाचा हा पुरस्‍कार गुगल मॅपवर फोटो टाकून आणि सर्व फॉर्म व्‍यवस्‍थित भरल्‍यानेच मिळाला आहे. यासाठी अभिजित बापट यांनी प्रचंड कष्‍ट घेतले आहेत. हा पुरस्‍कार स्‍वच्‍छतेसाठी नाही तर कागदपत्रे पूर्ण भरल्‍याने मिळाला.’’

हेही वाचा: Corona Update : राज्यात 960 नवीन रुग्ण तर 41 रुग्णांचा मृत्यू

अविनाश कदम म्‍हणाले, ‘‘नगराध्‍यक्षा गेल्‍या दोन ते तीन महिने पालिकेत आल्‍या असून, त्‍यांना डावलून हा पुरस्‍कार घेण्‍यात आला. स्‍वच्‍छतेच्‍या प्रकल्‍पात देखील मोठा भ्रष्‍टाचार असून, असले मॅनेज पुरस्‍कार घेण्‍यात साविआ पुढे असते.’’

loading image
go to top