अंगावरची हळद पिवळी असतानाच तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं अन् तिनंही जीव सोडला; भीषण अपघातात नवदांपत्य ठार

दीपक आणि अक्षदा जाधव (रा. वारुगड) यांच्या नवदांपत्याच्या मृत्यूने त्यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला.
Two-Wheeler Accident in Vadgaon Man
Two-Wheeler Accident in Vadgaon Manesakal
Summary

जखमी अक्षदाला उपचारासाठी तातडीने साताऱ्याला हलविण्यात आलं होतं. मात्र, नियतीने तिचं कुंकू पुसून काही तासही उलटले नसतानाच उपचारादरम्यान अक्षदाने देखील जगाचा निरोप घेतला.

गोंदवले : विवाहाला अवघे चार महिने झालेले... दोघांच्याही अंगावरची हळद अजूनही पिवळी असतानाच तिच्या कपाळाचं कुंकू पुसलं गेलं आणि त्यानंतर काही वेळातच तिनेही जीव सोडला. ही घटना माण तालुक्यातील वडगाव येथे घडली. गुरुवारी संध्याकाळी कार आणि दुचाकीमध्‍ये झालेल्या भीषण अपघातात (Road Accident) होत्याचं नव्हतं झालं.

दीपक आणि अक्षदा जाधव (रा. वारुगड) यांच्या नवदांपत्याच्या मृत्यूने त्यांनी रंगवलेल्या सुखी संसाराच्या स्वप्नांचा चुराडा झाला. वारुगडचा दीपक जाधव आणि किरकसालची अक्षदा चव्हाण हे गेल्या नोव्हेंबरमध्येच विवाह (Marriage) बंधनात अडकले होते. दोघंही सुखी संसाराची सोनेरी स्वप्नं पाहत असतानाच काल संध्याकाळी अघटित घडलं.

Two-Wheeler Accident in Vadgaon Man
'लिव्ह इन रिलेशन'च्या वादातून तरुणीचा खून; आई, भावासह तिघांना अटक, लाकडी दांडक्याने रात्रभर बेदम मारहाण

अक्षदा ही गोंदवले बुद्रुक येथील नवचैतन्य ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत होती. गुरुवारी परीक्षेचा पेपर देऊन पती दीपकसोबत ती घरी निघाली होती. फलटण- दहिवडी मार्गाने दुचाकीवरून घरी निघाल्‍यावर त्यांची दुचाकी (एमएच ११ एए २४०८) व समोरून येणाऱ्या कार (एमएच ४५ एन ६२८३) यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला.

Two-Wheeler Accident in Vadgaon Man
Kolhapur Crime : कोल्हापुरात तरुणाचा पाठलाग करून धारदार शस्त्रांनी निर्घृण खून; चेहऱ्यावर, छातीवर, पाठीवर सपासप वार

दुचाकीस्वार दीपक व अक्षदा यांच्यासह कारचालक गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर काही वेळातच गंभीर जखमी दीपकचा उपचाराला नेत असतानाच मृत्यू झाला, तर जखमी अक्षदाला उपचारासाठी तातडीने साताऱ्याला हलविण्यात आलं होतं. मात्र, नियतीने तिचं कुंकू पुसून काही तासही उलटले नसतानाच उपचारादरम्यान अक्षदाने देखील जगाचा निरोप घेतला. या अपघातात दोन जिवांच्या मृत्यूबरोबरच सुखी संसाराच्या स्वप्नांचाही चुराडा झाला. या अपघातात एकाच वेळी नवदांपत्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद दहिवडी पोलिस ठाण्यात झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com