

“Ranajitsinh Naik-Nimbalkar
Sakal
फलटण : डॉक्टर बहिणीचे चारित्र्यहनन व्हायला नको म्हणून आरोप होऊनही मी गप्प होतो; परंतु त्यांचे आरोप थांबत नव्हते. बदनामी सहन करायलाही मर्यादा असते. ननावरे कुटुंबीय, डॉक्टर युवतीची आत्महत्या, आगवणेंच्या मुलींचा आत्महत्येचा प्रयत्न, मुकादमांना मारहाण या कोणत्याही प्रकरणात माझा काहीही संबंध नाही. फलटणचा विकास होतोय, ते बदलतेय, हे पाहावत नसल्यामुळे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजेंच्या मास्टमाइंडमधून ही सर्व प्रकरणे माझ्यावर शेकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नार्को चाचणी, लाय डिटेक्टर टेस्ट करायला तयार आहे. हिंमत असेल, तर रामराजेंनीही त्यासाठी तयार व्हावे, असे जाहीर आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज केले.