esakal | कापील खूनप्रकरणात बाळू पाटलास न्यायालयाने सुनावली जन्मठेप

बोलून बातमी शोधा

Court Order
कापील खूनप्रकरणात बाळू पाटलास न्यायालयाने सुनावली जन्मठेप
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करणाऱ्या कापील येथील एकास जन्मठेप व 50 हजारांच्या दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. ए. ए. औटी यांनी आज ठोठावली. दंड न भरल्यास दोन वर्षांची सक्तमजुरी वाढवण्याचेही आदेशात म्हटले आहे. सहा वर्षांपूर्वी मलकापूर येथील एका पतसंस्थेशेजारील मोकळ्या जागेत खून झाला होता. बाळू ऊर्फ पांडुरंग दादासाहेब पाटील (वय 52 रा. कटपान मळा, कापील) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सुरेश पांडुरंग जाधव (रा. कटपान मळा, कापील) असे मृताचे नाव आहे.

सरकारी वकिलांसह पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा वर्षांपूर्वी 3 ऑगस्टला 2015 रोजी सकाळी सातच्या सुमारास खून झाला होता. मलकापुरातील पतसंस्थेच्या शेजारील मोकळ्या जागेत पांडुरंग पाटीलने सुरेश जाधववर हल्ला केला. त्या वेळी त्याच्यासोबत त्याचा अल्पवयीन मुलगाही होता. पांडुरंग पाटीलने दोन नंबरच्या पत्नीसमवेत जाधवचे अनैतिक संबंध आहेत, या संशयावरून हल्ला केला होता. सुरी व कोयत्याने केलेले वार जाधवच्या डोके, कपाळ, मान, पाठीवर झाले होते. त्यात त्याचा मृत्यू झाला. रोहित दिलीप जाधव याने त्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार तत्कालीन पोलिस निरीक्षक आर. एच. राजमाने यांनी त्याचा सखोल तपास केला. गुन्ह्याचा तपास करताना परिस्थितीजन्य गोष्टी त्यांनी समोर आणल्या होत्या.

महाबळेश्वर, पाचगणीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; स्ट्रॉबेरीचे मोठे नुकसान

जिल्हा सत्र न्यायालयात खुनाचे दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या गुन्ह्याची सुनावणी जिल्हा सत्र न्यायाधीश औटी यांच्यासमोर सुरू होती. सरकार पक्षातर्फे ऍड. आर. सी. शहा यांनी काम पाहिले. गुन्ह्याचा तपास करणारे तत्कालीन पोलिस निरीक्षक राजमाने यांचा जबाबही महत्त्वाचा ठरला. त्यांनी केलेल्या तपासातील शास्त्रोक्त पुरावा महत्त्वाचे ठरले. हवालदार अशोक मदने, हवालदार खिलारे यांनी पोलिस ठाण्याचे पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

बावधननंतर पांडेत होणार 'बगाड'; यात्रास्थळी चोख पोलिस बंदोबस्त