मायणीत पाण्याचा ठणठणाट; 20 दिवसांपासून पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Mayani Water Scheme
Mayani Water Schemeesakal

मायणी (सातारा) : मायणी प्रादेशिक योजनेची (Regional Scheme) पाणीउपसा करणारी मोटार नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून मायणीकर पाणी-पाणी करीत आहेत. ग्रामपंचायतीकडून (Gram Panchayat) पर्यायी व्यवस्था होत नसल्याने खासगी टॅंकरसाठी (Private Tanker) 600 रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. परिणामी, त्रस्त नागरिक ग्रामपंचायतीच्या नावाने खडे फोडत आहेत. (In The Mayani The Regional Scheme Of Water Pump Is Faulty Satara Marathi News)

Summary

मायणी प्रादेशिक योजनेची पाणीउपसा करणारी मोटार नादुरुस्त झाल्यामुळे गेल्या 20 दिवसांपासून मायणीकर पाणी-पाणी करीत आहेत.

मायणीसह पाच गावांच्या प्रादेशिक पाणीयोजना सुरू आहेत. मात्र, सततच्या तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा होत नसल्याने चितळी, गुंडेवाडी, मोराळे व मरडवाक ही चारही गावे प्रादेशिक योजनेतून बाहेर पडली. आत्ता योजनेचा सर्व भार मायणी ग्रामपंचायतीवर पडतो. आलेले सर्व वीजबिल मायणी पंचायतीलाच भरावे लागते. महिन्यापूर्वी पाणीउपसा करणारी मोटार नादुरुस्त झाली होती. त्यामुळे पाणीपुरवठा (Water Supply) वारंवार खंडित होत आहे.

Mayani Water Scheme
पुणे- सातारा प्रवास हाेणार सुखकर; आठ किलोमीटरचे अंतर होणार कमी

आताही पाणीउपसा करणारी 90 अश्वशक्तीची मोटार नादुरुस्त झाल्याने 20 दिवसांपासून येथील कचरेवाडी, इंदिरानगर, माळीनगर, चांदणी चौक, शिक्षक कॉलनी, सराटे मळा, लक्ष्मीनगर, खंडोबा माळ, नवीन गावठाण आदी भागांतील पाणीपुरवठा बंद आहे. ग्रामपंचायतीने पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्थाही केली नाही. त्यामुळे पाणीटंचाईने नागरिक हैराण झालेत. हातपंप, खासगी विंधन विहिरीवर लोक पाण्यासाठी धावपळ करीत आहेत. महागाईने कंबरडे मोडलेल्या नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. एका टॅंकरसाठी 600 रुपये मोजावे लागत आहेत. ग्रामपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होत आहे.

Mayani Water Scheme
काेराेनाची परिस्थिती तुमच्यामुळे हाताबाहेर गेली; खापर आमच्यावर

मोटार दुरुस्त केली आहे. स्टार्टर बसविण्याचे काम सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत होईल.

-आनंदराव शेवाळे, उपसरपंच, मायणी

Mayani Water Scheme
Video पहा : असा झाला 'ग्रिफॉन'चा 900 किलोमीटर प्रवास

पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत ग्रामपंचायतीने टॅंकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याची गरज आहे. लोकांना टॅंकरच्या खर्चाचा भुर्दंड कशासाठी?

-दादासाहेब कचरे, माजी उपसरपंच, मायणी

In The Mayani The Regional Scheme Of Water Pump Is Faulty Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com