
कोरोना घातक आजाराचे सर्वत्र थैमान सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस त्याच्यात वाढच होत आहे. गावागावांत कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. विंगसह परिसरात कोरोना बाधिताची संख्या दीडशेकडे गेली आहे. प्रत्येक गावात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात कायम असताना सर्दी, खोकला व ताप यांसारख्या आजाराने आता डोके वर काढले आहे.
सर्दी, खोकला, डोकेदुखीच्या रुग्णांत वाढ; ग्रामस्थांच्या मनात चुकचुकतेय शंकेची पाल!
विंग (जि. सातारा) : एकीकडे कोरोनाची भीती मनात कायम असताना नियमित सर्दी, खोकला, डोकेदुखी अणि तापानेदेखील ग्रामस्थ फणफणले आहेत. सर्रास घरटी एखादी-दुसरी व्यक्ती वरील आजाराने येथे ग्रस्त आहे. आरोग्य विभागाचा ताण त्यामुळे आणखी वाढला आहे. व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम असल्याचे येथील खासगी डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले.
कोरोना घातक आजाराचे सर्वत्र थैमान सुरू आहे. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस त्याच्यात वाढच होत आहे. गावागावांत कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. विंगसह परिसरात कोरोना बाधिताची संख्या दीडशेकडे गेली आहे. प्रत्येक गावात रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीती नागरिकांच्या मनात कायम असताना सर्दी, खोकला व ताप यांसारख्या आजाराने आता डोके वर काढले आहे.
आदर्शवत! बहिणीच्या स्मरणार्थ रुग्णांना मोफत श्वास
घरटी एखादी-दुसरी व्यक्ती सर्रास येथे या आजाराने हैराण आहे. त्यातल्या त्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक आहेत. ही कोरोनाग्रस्तांच्या लक्षणासारखीच लक्षणे असल्याने ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे. त्यासाठी उपचार काय घ्यावेत? की नको, कोविड निदान करावे लागल्यास मग पुढे काय असे प्रश्न उपस्थित होत आहे. भीतीपोटी अनेक जण खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घेत आहेत. काही जण घरीच अंगावर दुखणे काढणारे रुग्णदेखील येथे आहेत. येथे चार ते पाच खासगी रुग्णालये आहेत. एक प्राथमिक आरोग्य उपकेंद्रदेखील आहे. त्या-त्या रुग्णालयात वरील आजाराचे रुग्ण दाखल होत आहेत. उपचार घेत आहेत.
वाई अर्बनतर्फे 25 ऑक्सिजन सिलिंडर; सामाजिक बांधिलकीतून निर्णय
व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम
येथील डॉ. लक्ष्मण खबाले यांच्या म्हणण्यानुसार 15 ते 20 टक्क्यांनी रुग्णसंख्या येथे वाढलेली आहे. उपचारासोबत योग्य सल्ला आम्ही त्यांना देत आहोत. हा व्हायरल इन्फेक्शनचा परिणाम आहे. ज्यांना सर्दी, खोकला किंवा तापाची लक्षणे आढळ्यास कोणीही घाबरून जाऊ नये. मात्र, काळजी घेण्याची गरज आहे. आजारी व्यक्तीने इतरांचा संपर्क टाळवा, दिलेल्या औषधासोबत विश्रांतीदेखील त्यासाठी महत्त्वाची आहे. अतिजोखमीचे रुग्णांना मात्र आम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवत आहोत, असेही ते म्हणाले.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Web Title: Increase Patients Viral Infections Satara News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..