जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे माजी सैनिकांना आवाहन

सिद्धार्थ लाटकर
Wednesday, 13 January 2021

संबंधितांनी 20 जानेवारीपर्यंत उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सातारा : भारत-पाकिस्तानमध्ये 1971 च्या युद्धात सक्रिय सहभाग घेतलेल्या आणि सैन्य सेवेचे निवृत्ती वेतन किंवा केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून मासिक अथवा वार्षिक आर्थिक मदत मिळत नाही अशा माजी सैनिक, विधवा यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यातील ज्या माजी सैनिकांनी सन 1971 च्या पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतला. मात्र त्यांना मासिक अथवा वार्षिक आर्थिक मिळत नाही त्यांनी युद्धात सहभाग घेतल्याबाबतच्या पुराव्याची छायांकित प्रत, डिस्चार्ज बुक व ओळखपत्र घेऊन कार्यालयीन वेळेत 20 जानेवारीपर्यंत सैनिक कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

सरपंचपद नकाे रे बाबा ! का आमच्या गावाला बदनाम करालायस ?

गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणाऱ्या नवरा-नवरी सुळक्यावर कुमठेच्या राेहितची चढाई


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Pakistan War 1971 Retired Officers Contact Military Office Satara