esakal | साताऱ्यात शुक्रवारी जेल फोड शौर्यदिन
sakal

बोलून बातमी शोधा

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी

साताऱ्यात शुक्रवारी जेल फोड शौर्यदिन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सातारा : क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी स्वातंत्र्य संग्रामात सातारा कारागृहातून उडी मारून भूमिगत झाले होते. या घटनेला शुक्रवारी (ता. १०) ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त सकाळी दहाला सातारा कारागृहाच्या बाहेर सातारा जेल फोड शौर्य दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात येणार आहे.

हेही वाचा: महारुगडेवाडीची कन्या अमेरिकेला! उच्च शिक्षणासाठी निकीता रवाना

नागनाथअण्णा नायकवडी यांचे ब्रिटिश सरकारच्या विरोधातील प्रतिसरकारच्या माध्यमातून केलेले काम व त्यांचे योगदान मोलाचे आहे. स्वातंत्र्याच्या लढाईत ब्रिटिश सरकारने पकडून त्यांना इस्लामपूर येथील कारागृहात ठेवले होते. पण, तेथे ठेवणे ब्रिटिशांना अडचणीचे वाटू लागल्याने क्रांतिवीर नागनाथअण्णा यांना साताऱ्याच्या कारागृहात हलविण्यात आले. या कारागृहाच्या अभेद्य तटाच्या भिंतीवरून आपल्या सहकाऱ्यांच्या सहाय्याने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी हे १० सप्टेंबर १९४४ ला उडी मारून भूमिगत झाले. या ऐतिहासिक घटनेस शुक्रवारी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत.

हेही वाचा: कास पठार परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग; जनजीवन गारठलं

यानिमित्त सातारा कारागृहाच्या बाहेर सातारा जेल फोड शौर्य दिनानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृत्यर्थ उभारलेल्या स्तंभाला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात येईल. या वेळी प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती वाळवा येथील पद्मभूषण क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी- हुतात्मा किसन अहिर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वैभवकाका नायकवडी यांनी दिली.

loading image
go to top