Jalna Maratha Andolan : बार असोसिएशनचा ऐतिहासिक निर्णय! मराठा आंदोलकांवरील खटले लढणार विनामोबदला, आंदोलनालाही दिला पाठिंबा

जालना येथील घटनेचा सातारा वकील संघटनेच्या तातडीच्या बैठकीत निषेध करण्यात आला.
Jalna Maratha Andolan Satara Bar Association
Jalna Maratha Andolan Satara Bar Associationesakal
Summary

सातारा बार असोसिएशनने घेतलेला निर्णय राज्यभरातील वकिलांनी घ्यावा.

सातारा : जालना जिल्ह्यात मराठा बांधवांवर झालेला अमानुष लाठीहल्ला, मराठा आरक्षण या विषयावर राज्यभर चाललेल्या मराठा आंदोलनाला जिल्हा बार असोसिएशनने (Satara Bar Association) पाठिंबा दिला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत मराठा आंदोलकांवरील खटले विनामोबदला चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jalna Maratha Andolan Satara Bar Association
Kolhapur Bandh : मराठा आंदोलकांवर अमानुष लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापूर आज बंद; सर्व शाळांना सुटी जाहीर

जालना येथील घटनेचा सातारा वकील संघटनेच्या तातडीच्या बैठकीत निषेध करण्यात आला. या वेळी अध्यक्ष अॅड. विजय देशमुख, उपाध्यक्ष अॅड. जितेंद्र पिसाळ, पदसिद्ध उपाध्यक्ष अॅड. महेश नारायण कुलकर्णी, जिल्हा सरकारी वकील, सचिव अॅड. सुरेश महादेव रूपनवर, सहसचिव अॅड. रोहिणी शंतनू राक्षे, खजिनदार अॅड. गणेश जगन्नाथ राऊत, माजी अध्यक्ष अॅड. अंकुश जाधव, बार असोसिएशनचे सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Jalna Maratha Andolan Satara Bar Association
Hasan Mushrif : मराठा आरक्षण रद्द होण्यामागची खरी कारणं लोकांना माहिती आहेत; हसन मुश्रीफांचा कोणावर निशाणा?

जालना घटनेतील दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, जे मराठा आंदोलनकर्ते आहेत, त्यांच्या खटल्यात विनामोबदला वकीलपत्र दाखल करणार असल्याचे निवेदन बार असोसिएशनकडून निवासी उपजिल्हाधिकारी, मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना देण्यात आले आहे. सातारा बार असोसिएशनने घेतलेला निर्णय राज्यभरातील वकिलांनी घ्यावा. आरक्षणाच्या लढ्यात कायदेशीर बाजू मांडून आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी भावना समन्वयकांनी व्यक्त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com