Shahaji Patil : जयाभाऊ भावी मंत्री हुतंय हुतंय..; आमदार शहाजी पाटलांची जोरदार टोलेबाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahaji Patil Jaykumar Gore

बैलगाडी शौकिनांकडून आमदार पाटील यांना डायलॉग म्हणण्याची जोरदार मागणी करण्यात आली.

Shahaji Patil : जयाभाऊ भावी मंत्री हुतंय हुतंय..; आमदार शहाजी पाटलांची जोरदार टोलेबाजी

दहिवडी (सातारा) : जयाभाऊ भावी मंत्री, ओक्के म्हणत आमदार शहाजी पाटलांनी (MLA Shahaji Patil) विरकरवाडीत चौफेर टोलेबाजी केली. यावर आमदार जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी हसून प्रतिसाद दिला असता आमदार पाटलांनी हुतंय, हुतंय म्हणत पुन्हा एकदा जोरदार हशा पिकवला.

विरकरवाडी (ता. माण) इथं मंगळवारी भव्य बैलगाडी शर्यतीचं (Bullock Cart Race) आयोजन करण्यात आलं होतं. या बैलगाडी शर्यतीचा बक्षीस समारंभ आमदार जयकुमार गोरे व आमदार शहाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला होता.

यावेळी उपस्थित बैलगाडी शौकिनांकडून आमदार पाटील यांना डायलॉग म्हणण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या मागणीला प्रतिसाद देत आमदार पाटील यांनी डायलॉगबाजी केली. ते म्हणाले, शिंदे साहेब मुख्यमंत्री.. त्यावर उपस्थितांनी ओक्के म्हणत प्रतिसाद दिला. नंतर फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, ओक्के असा डायलॉग म्हटला. त्याला जोडूनच ते जयाभाऊ भावी मंत्री म्हणाले असता उपस्थितांनी ओक्के म्हणत जोरदार प्रतिसाद दिला.