Wagholi Employment Scam: ठरल्याप्रमाणे नोकरी लागली नाही. अनेक महिने उलटूनही काहीच घडत नसल्यामुळे प्रतीकला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने पोलिसात धाव घेतली. त्यानुसार, वाठार पोलिस ठाण्यात उमेश भोईटे आणि दीपक चव्हाण यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाठार स्टेशन : वाघोली (ता. कोरेगाव) येथील प्रतीक चंद्रकांत भोईटे (वय २६) याच्याकडून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोन लाख ७० हजार रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी वाठार पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.