पैसे हडप करणाऱ्यांची गय केली जाणार नाही; गृहराज्यमंत्र्यांचा थेट इशारा

Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Summary

'गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार आहे.'

पाटण (सातारा) : ठाणे येथील कालिकाई इंडस्ट्रीज व अॅग्रो मल्टीस्टेट सोसायटी कंपनीने केलेल्या फसवणुकीचा तपास व्हावा, असे निवेदन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाटणसह कऱ्हाड तालुक्यातील गुंतवणूकदारांनी दिले आहे. कंपनी संचालकांसह गुंतवणूकदारांचे पैसे हडप करणाऱ्या भामट्यांना सहआरोपी करण्याची मागणी सभासदांसह गुंतवणूकदारांनी केली आहे. दोषींची गय केली जाणार नाही. गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे मिळेपर्यंत पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी गुंतवणूकदारांना दिली आहे.

निवेदनातील माहिती अशी, कालिकाई इंडस्ट्रीज (Kalikai Industries) व संपर्क अॅग्रो कंपनीने आर्थिक गुंतवणुकीवर आकर्षित व्याज परताव्याचे आमिष दाखवून पाटण तालुक्यासह परिसरातील किमान दोन हजार सामान्यांची फसवणूक केली आहे. कंपनीने चाफोली रोड पाटण येथे कार्यालय सुरू केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध असल्याचे आमिष दाखवून कमिशनवर शेकडो गुंतवणूक प्रतिनिधी सभासद नेमले. पाटण तालुक्यासह परिसरातील किमान दोन हजार सर्वसामान्य लोकांना सभासद करून त्यांच्याकडून तीन, पाच, सात व नऊ वर्षांच्या मुदतीवर व्याज परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून घेतली.

Shambhuraj Desai
Punjab : राघव चढ्ढासह हरभजन सिंग राज्यसभेवर जाणार!

२०१३-१४ मध्‍ये पाटणला स्वमालकीचे चार गाळे खरेदी केले. कंपनीने २०१६-१७ पर्यंत मुदत संपणाऱ्या गुंतवणूकदारांचे पैसे परत केले. कंपनीने २०१७ नंतर संपलेल्या मुदतीचे पैसे द्यायचे बंद केले. कालांतराने कंपनीच बंद केली. त्यामुळे तालुक्यातील हजारो सभासद गुंतवणूकदार या आर्थिक फसवणुकीत अडकले आहेत. कंपनीचे स्वमालकीचे कार्यालय २०२० रोजी येथील कार्यालय काही स्थानिकांनी कंपनीचे मुख्य संचालक हेमंत रेडीज, अदित्य रेडीज यांना हाताशी धरून व्यवहार केला. त्यातून ४० लाख रुपये आपापसात वाटून घेऊन पुन्हा गुंतवणूकदारांची फसवणूक केली. कंपनीने केलेल्या आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com