जिल्हा बॅंकेसाठी 'हॉट' बनलेल्या कऱ्हाडला मतदान प्रक्रियेस प्रारंभ; सहकारमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Bank Election

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय उलाढालीनंतर आज रविवारी मतदान होत आहे.

जिल्हा बॅंकेसाठी 'हॉट' बनलेल्या कऱ्हाडला मतदान प्रक्रियेस प्रारंभ

कऱ्हाड (सातारा) : राज्याचे लक्ष लागलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या (Satara Bank Election) कऱ्हाड सोसायटी गटातील (Karad Society Group) मतदान प्रक्रियेसाठी आज रविवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. मतदानाच्या पार्श्वभूमीवर आणि हा मतदारसंघ हॉट असल्याने पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरुन मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केलाय.

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी मोठ्या राजकीय उलाढालीनंतर आज रविवारी मतदान होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress Party) नेत्यांनी सर्वपक्षीय नेत्यांना विचारात घेवून जिल्हा बॅंकेची निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली होती. मात्र, त्याला पूर्णपणे यश आले नाही. इच्छुकांची संख्या वाढल्याने जिल्हा बॅंकेच्या २१ जागापैकी ११ जागा बिनविरोध झाल्या, तर उर्वरीत १० जांगासाठी निवडणुक लागलीय. त्यासाठी सातारा जिल्ह्यातील विविध मतदार संघातील २० मातब्बर उमेदवार निवडणुक रिंगणात असून त्यांना निवडूण आणण्यासाठी नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावलीय. सातारा जिल्हा बॅंकेसाठीच्या कऱ्हाड सोसायटी गटात १४० मते आहेत. त्या गटातून खुद्द राज्याचे सहकार खाते ताब्यात असलेले सहकार मंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) यांनीही सोसायटी गटातून कौल आजमावला आहे.

हेही वाचा: रांजणेंनी NCP च्या नेत्यांची धुडकावून लावली 'ऑफर'

त्यांच्या विरोधात माजी सहकारमंत्री (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर (Udaysingh Patil-Undalkar) यांनी उमेदवारी घेतलीय. ही लढाई मोठी प्रतिष्ठेची बनली आहे. निवडणुकीच्या मतदानास त्यासाठी आज सकाळी येथील शिवाजी हायस्कूलमध्ये प्रारंभ झाला. मतदान आज सकाळी आठ ते सायंकाळी पाच या दरम्यान होत आहे. मतदानासाठीची सर्व तयारी सहकार विभागाने पूर्ण केली आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस उपाधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कऱ्हाडचे वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठा पोलिस फौजफाटा तैनात केलाय. दरम्यान, शिवाजी हायस्कूलमध्ये एकावेळी जास्त मतदार आले, तर होणारी गर्दी विचारात घेवून सहकार विभागाने तीन ठिकाणी मतदानाची व्यवस्था केलीय.

हेही वाचा: BJP आमदाराच्या 'या' विधानामुळे NCP आमदाराचा विजयाचा मार्ग मोकळा?

loading image
go to top