esakal | गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव
sakal

बोलून बातमी शोधा

गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

गोळेश्वरमधील लोकांना पाणी देणे पालिकेला व्यवहारिकदृष्ट्या परवडत नसल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

गोळेश्वरकरांना कऱ्हाडचे पाणी मिळणार नाही; पालिकेचा ठराव

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड (जि. सातारा) ः गोळेश्वरला झालेल्या 24 तास पाणी योजनांचा लाभ घेणाऱ्या तेथील मिळकतधारकांचे पाणी कनेक्‍शन बंद करण्याचा ठराव येथील पालिकेच्या बैठकीत करण्यात आला. त्यानुसार तेथील 30 लोकांना नोटिसा बजावून पाणी कनेक्‍शन बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

पालिकेतर्फे शहरालगतच्या गोळेश्वर गावातील 200 नागरिकांनी पाणी दिले जाते. गोळेश्वरला मागील काही दिवसांत 24 तास पाणी योजना झाली. त्यामुळे हळूहळू गोळेश्वरच्या भागातील नागरिकांनी पाणी 24 तास योजनेतून घेण्यास सुरवात केली. त्यामुळे उरलेले काही मोजकेच नागरिक कऱ्हाडचे पाणी घेत होते.

पाणी देणे व्यवहारिकदृष्टीने पालिकेलाही ते परवडत नव्हते. त्यामुळे त्यांचे पाणी बंद करण्याचा निर्णय पालिकेत घेण्यात आला. त्याचा ठरावही घेण्यात आला. त्या ठरावाव्दारे त्या भागातील नागरिकांचे पाणी कनेक्‍शन बंद करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार त्यांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. गोळेश्वरमधील लोकांना पाणी देणे पालिकेला व्यवहारिकदृष्ट्या परवडत नसल्याने निर्णय घेण्यात आला आहे.

खवय्यांनो खुशखबर! साताऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांची मटण, चिकनच्या दुकानांना परवानगी

शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द; शिंगणापुरात प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय

कऱ्हाडात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार; अपशिंगेच्या एकास सक्तमजुरी

Edited By : Siddharth Latkar 

loading image