esakal | ''खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या, आम्ही पालिका चालवून दाखवतो''
sakal

बोलून बातमी शोधा

''खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या, आम्ही पालिका चालवून दाखवतो''

अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी स्टेडियमची दरवाढ झाली. त्याची माहिती खुद्द नगराध्यक्षांना नसावी, याचे आश्‍चर्य वाटते. मात्र, ती जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे, त्यावर त्यांची सही आहे. मात्र, ती न स्वीकारता थेट प्रशासनाला जबाबदार धरणे दुर्दैवी आहे. 

''खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा द्या, आम्ही पालिका चालवून दाखवतो''

sakal_logo
By
सचिन शिंदे

कऱ्हाड : अर्थसंकल्पातील विकासकामांच्या निविदांच्या आकड्यातील किती टक्केवारी मला मिळेल, अशा मानसिकतेतील नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कऱ्हाडच्या विकासाचा खोळंबा केला आहे, असा आरोप जनशक्तीचे नेते राजेंद्र यादव यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
 
ज्येष्ठ नगरसेवक पावसकर म्हणजे पालिकेतील अतृप्त आत्मा आहेत, तर नगराध्यक्षांना प्रत्येक कामात टक्केवारी हवी, अशी अवस्था पालिकेची करून ठेवली आहे, असाही आरोप यादव यांनी केला आहे. श्री. यादव म्हणाले,"" सार्वजनिक नळावर पाणी भरताना जशी भांडणे असतात, तशा पद्धतीने पालिकेच्या मासिक सभेत नगराध्यक्षा शिंदे वावरतात, त्याच पद्धतीने त्या बोलतात. त्यामुळे पालिकेचे बजेट म्हणजे काय, त्यात काय तरतुदी असतात, त्याचे ज्ञान त्यांना नाही. म्हणूनच अल्पमतात असतानाही हट्टाने सूचना मांडल्या की, त्यावर हरकतीही तेच घेतात. बहुमताचा आदर न करता आपला हेकटपणा करतात. त्यामुळे अर्थसंकल्पात छत्रपती शिवाजी स्टेडियमची दरवाढ झाली. त्याची माहिती खुद्द नगराध्यक्षांना नसावी, याचे आश्‍चर्य वाटते. मात्र, ती जबाबदारी नगराध्यक्षांचीच आहे, त्यावर त्यांची सही आहे. मात्र, ती न स्वीकारता थेट प्रशासनाला जबाबदार धरणे दुर्दैवी आहे. 

सौरभ पाटलांच्या तोंडाला कुलूप होते का? भाजप नगराध्यक्षा आक्रमक

त्यामुळेच अर्थसंकल्पाची मूळ सूचना जनशक्तीने फेटाळून लावत उपसूचना मांडावी लागली. त्यात 38 कामे सुचवली आहेत. त्यामुळे अर्थसंकल्प 134 कोटींवरून 270 कोटींकडे जातो आहे. ते बजेट आता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे जाईल. मात्र, त्यात आम्ही उपसूचनेव्दारे सुचवलेली विकासकामेच नगराध्यक्षा शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक पावसकर, फारूक पटवेकर यांना झोंबल्याने त्यांनी थयथयाट करत बेछुट आरोप केले. आम्ही जबाबदारी स्वीकारतो, तशी तुम्ही स्वीकारली पाहिजे. मात्र, त्यापासून तुम्ही पळता, सूचना मांडता त्याची जबाबदारी स्वीकारून दाखवा. ते जमत नसेल तर नगराध्यक्षा शिंदे, पावसकर, पटवेकर यांनी पालिकेतील खुर्च्या झिजवण्यापेक्षा राजीनामा देऊन तुम्ही बाहेर पडा, आम्ही पालिका चालवून दाखवतो.'' 

आसाम निवडणुकीसाठी छाननी समितीच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण

श्री. यादव म्हणाले, ""नगराध्यक्षांचे लक्ष केवळ टक्केवारीवर आहे. पहिल्या वर्षी पावसकर व त्यांच्याच सहकाऱ्यांनी नगराध्यक्षांना रडवले होते. त्यावेळी त्यांना आम्ही साथ दिली. मात्र, आता टक्केवारीसाठी त्यांनी हातमिळवणी केल्याचेच दिसते. मध्यंतरी आम्ही ठेकेदारांची बैठक घेतली. त्यात पालिकेतील कोणालाही एक टक्का रक्कम द्यायची नाही, असे खडसावून सांगितले. त्या दिवसापासून नगराध्यक्षा जनशक्तीपासून दुरावल्या आहेत. आमच्यासोबत असत्या तर टक्केवारीच बंद पाडली असती, त्याची भीती त्यांना होती.''

सारथी बंद करण्यास उपमुख्यमंत्रीच जबाबदार; सेनेच्या नेत्याची अजित पवारांवर सडकून टीका

बोंबला! इंदोलीतील लग्नासाठी कोरेगाव तालुक्यातून एकजण आला अन् चारजणांना सोबत घेऊन पॉझिटीव्ह झाला

Edited By : Siddharth Latkar

loading image