Raju Shetti Protest News
esakal
कराड : कर्नाटकातील कोगनोळी टोल नाक्याजवळ माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील (एनएच-४८) वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली (Pune Bengaluru highway traffic) आहे. या पार्श्वभूमीवर महामार्ग पोलिसांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः सातारा, कराड, कोल्हापूर आणि सांगली परिसरातून कर्नाटकाच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.