esakal | भावजय सरपंच, दीर उपसरपंच; अंधारी-कासला शेलार कुटुंबात आनंदाेत्सव
sakal

बोलून बातमी शोधा

भावजय सरपंच, दीर उपसरपंच; अंधारी-कासला शेलार कुटुंबात आनंदाेत्सव

अंधारी येथे तीन जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सरपंच, उपसरपंचांसह त्यांच्या गटाचा एक सदस्य निवडून आला. 

भावजय सरपंच, दीर उपसरपंच; अंधारी-कासला शेलार कुटुंबात आनंदाेत्सव

sakal_logo
By
सूर्यकांत पवार

कास (जि. सातारा) : जागतिक वारसास्थळ असलेल्या कास-अंधारी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीत दीर व भावजय यांना सरपंच व उपसरपंचपदाचा मान मिळाला. सुरेखा शेलार व रवींद्र शेलार यांची अनुक्रमे सरपंच व उपसरपंचपदी निवड झाली.
 
एकूण सात सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत ओबीसी संवर्गातील एक महिला व एक पुरुष अशा दोन जागा जातीच्या दाखल्यामुळे रिक्त राहिल्या. उर्वरित पाच जागांसाठी कास गावातून दोन महिला निवडून आल्या, तर अंधारी येथे तीन जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये सरपंच, उपसरपंचांसह त्यांच्या गटाचा एक सदस्य निवडून आला. 

या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंचपदाची निवडणूक झाली. त्यामध्ये पांडुरंग नारायण शेलार यांची धाकटी सून सुरेखा दिलीप शेलार यांची सरपंच आणि पांडुरंग नारायण शेलार यांचे ज्येष्ठ चिरंजीव रवींद्र पांडुरंग शेलार उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली. मोठा मुलगा उपसरपंच, तर धाकटी सून सरपंच असा दुहेरी योग पांडुरंग शेलार यांच्या घरात आला. निवडणूक निर्णय अधिकारी विजय शिंदे यांनी या निवडी घोषित केल्या. त्याप्रसंगी ग्रामसेवक प्रशांत शिंगटे, नूतन सदस्य संतोष शेलार, माजी सरपंच तानाजी शेलार, निवृत्त पोलिस पाटील आप्पाजी शेलार, ग्रामपंचायत कर्मचारी शिवराम शेलार उपस्थित होते. सर्वांना एकत्रित घेऊन विकास करून दाखविण्याची उपसरपंच रवींद्र शेलार यांनी ग्वाही दिली.

CBSE च्या विद्यार्थ्यांनाे! दहावी-बारावीच्या बाेर्ड परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी मिळाली मुदत वाढ? जाणून घ्या शेवटची तारीख

अमिर खानावर कारवाई केलेले हवालदार संजय साबळे पुन्हा चर्चेत

पीडब्ल्यूडीत नोकरी लावतो सांगून सांगलीतील एकाने लाखो रुपये लाटले

पन्नास वर्षांत प्रथमच महिलेस मिळाला सरपंचपदाचा मान

माझे आई-वडील व मुलाची काळजी घ्या; व्हॉटस्ॲप स्टेटस ठेवून क्रिकेटपटूची आत्महत्या

सरपंचपदाच्या निवडीत सेनेचे प्रयत्न निष्फळ; भाजप- राष्ट्रवादीनेच मारली बाजी

Edited By : Siddharth Latkar

loading image