esakal | सातारकरांनाे! पाणी जपून वापरा, अन्यथा...
sakal

बोलून बातमी शोधा

Water

सातारकरांनाे! पाणी जपून वापरा, अन्यथा...

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : साताऱ्याचा जलदाता असणाऱ्या कास तलावात सद्यःस्थितीत साडेनऊ फूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. उपलब्ध पाणी आगामी साठ दिवस पुरेल, असा अंदाज पाणीपुरवठा विभाग व्यक्‍त करत आहे. पावसाळा लांबल्यास या ठिकाणाहून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे.

शहराला प्रामुख्याने कास, शहापूर आणि जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येतो. सध्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम पालिकेच्या वतीने सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर तलावाच्या पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. हे काम अपूर्ण असल्याने सध्यातरी उपलब्ध पाणीसाठ्यावर पालिकेला आगामी दोन महिन्यांच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करावे लागणार आहे. सद्यःस्थितीत कासमध्ये साडेनऊ फूट इतका पाणीसाठा आहे. तो आगामी 55 ते साठ दिवस पुरेल, असा अंदाज पालिकेच्या पाणीपुरवठा समितीचे पदाधिकारी, अधिकारी वर्तवत आहेत.

बेड पाहिजे, इंजेक्शन हवयं! भाजपच्या कार्यकर्त्यांना फाेन करा

वाढणाऱ्या उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाली असल्याने चिंतेमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. येत्या काही दिवसांत वळिवाचे दोन- चार जोरदार पाउस झाले, तर काही प्रमाणात कासच्या पाणीसाठ्यात वाढ होईल, अशी अपेक्षाही पालिका पदाधिकारी, अधिकारी व्यक्‍त करत आहेत. सध्याचा पाणीसाठा विचारात घेतला तर सातारकरांना पाणीटंचाईचा कोणताही सामना करावा लागणार नसला, तरी उपलब्ध पाणी जपून वापरणे गरजेचे असल्याचे मत सभापती सीता हादगे यांनी व्यक्‍त केले.

एकनाथ गायकवाड Visiting Card वरील नावासमोर 'कोंडवेकर' हा शब्द लिहायचेच!

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

loading image
go to top