Leopard Attack: नशीब बलवत्तर ! 'केळघर भागात बिबट्याचे दुचाकीस्वारांवर हल्ले'; मादीसह तीन-चार पिल्लांचा वावर, दोघांचे प्राण वाचले..
“Close Call in Kelghar: वाटंबे (चारदरा) येथील नंदू चिकणे आणि वरोशी येथील तेजस कासुर्डे हे काल (शनिवार) रात्री पावणेनऊच्या सुमारास वरोशी- वाहिटे रस्त्यावरून जात असताना बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून अचानक हल्ला केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
केळघर : रहदारी असलेल्या केळघर भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढू लागला आहे. शनिवारी रात्री बिबट्याने दुचाकीस्वारावर अचानक हल्ला केला. केवळ नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने दोघांचे प्राण वाचले.