Khambatki Ghat : वाहतूक पोलिसांच्‍या नियोजनामुळे ‘खंबाटकी’त कोंडी टळली

सातारा -पुणे महामार्गावर आज गाड्यांची संख्या खूपच जास्त आहे.
khambatki
khambatki sakal

खंडाळा - पाच दिवसांच्‍या गणपतीचे विसर्जन करून अनेकजण रविवारी वाहनातून पुण्याकडे निघाले होते. खंबाटकी घाटासह सातारा- पुणे महामार्गावर वाहनांची संख्‍या वाढली होती. तरीही महामार्ग वाहतूक पोलिसांच्या नियोजनामुळे या रविवारी मात्र सुदैवाने वाहतूक कोठेही खोळंबली नाही.

सातारा -पुणे महामार्गावर आज गाड्यांची संख्या खूपच जास्त आहे. महामार्गावर रांगेने वाहने जात होती. मात्र, ही वाहने आपल्या नेहमीच्या गतीने पुढे सरकत होती. केवळ आनेवाडी टोलनाक्यावर वाहनांची गर्दी असून, येथे वाहनांच्या रांगा लागल्या. मात्र, खंबाटकी बोगद्यात दोन लेन असूनही रस्त्यावरील गाड्या आपल्या वेगाने पुढे सरकत राहिल्‍या.

khambatki
Satar : विडणीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये सामना

भुईंज महामार्ग वाहतूक पोलिस व सातारा पोलिस या महामार्गाच्या वाहतुकीवर लक्ष ठेऊन आहेत. गणपतीची सुटी संपल्यानंतर अनेक चाकरमानी रविवार असल्याने आज कोकण, कोल्हापूरहून पुणे व मुंबईच्या दिशेने निघालेले पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com