सातारा, कोरेगाव, खटावमध्ये ओला दुष्काळ जाहीर करा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 20 October 2020

परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तशी परिस्थिती कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्‍यांत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिके शेतात पाणी साचल्याने काढू शकत नाहीत तर अजून दोन महिने शेतातील पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे आगामी रब्बी हंगामातील पिक शेतकरी घेऊ शकतील असे वाटत नाही.

सातारा : कोरेगाव, खटाव व सातारा तालुक्‍यांत ओला दुष्काळ जाहीर करून पिकांच्या झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी कोरेगाव शहर विकास मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. हे निवेदन कोरेगावच्या प्रांतांना देण्यात आले. 

परतीच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. तशी परिस्थिती कोरेगाव, खटाव आणि सातारा तालुक्‍यांत आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिके शेतात पाणी साचल्याने काढू शकत नाहीत तर अजून दोन महिने शेतातील पाणी कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे आगामी रब्बी हंगामातील पिक शेतकरी घेऊ शकतील असे वाटत नाही. 

प्रत्येक बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे करा : सभापती रामराजे

खरिपाचे पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक परिस्थितीने मेटाकुटीला आलेला आहे. तेव्हा शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी. हे निवेदन मंचचे अध्यक्ष किशोर बर्गे, दिलीपराव बर्गे, रामचंद्र बोतालजी, राजू बागवान आदींनी दिले. निवेदनावर कोरेगाव शहरातील शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Koregaon City Development Forum Has Demanded Compensation For Crops Damaged Due To Rains Satara News