
कोरेगाव : महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत प्रमाणित सोयाबीनचे बियाणे मोफत वाटण्यात येत आहे. मात्र, हे मोफत बियाणे वाटण्यासाठी महाबीजने नेमलेले दुकानदार आडमुठेपणा करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.