प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या मान्यतेने काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी चव्हाणांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली.

प्रदेशाध्यक्ष पटोलेंच्या मान्यतेने काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर

कोरेगाव : कोरेगाव तालुका (Koregaon Taluka) काँग्रेसची (Congress) कार्यकारिणी जाहीर झाली असून, तालुकाध्यक्षपदी अॅड. श्रीकांत चव्हाण (Adv. Shrikant Chavan) व कार्याध्यक्षपदी मनोहर बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. या कार्यकारिणीमध्ये जिल्हा परिषदेचे सदस्य भीमराव पाटील यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या मान्यतेने व तालुकाध्यक्ष अॅड. चव्हाण यांच्या शिफारशीनुसार जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. त्यामध्ये आठ उपाध्यक्षांची नियुक्ती झाली असून, त्यात प्रकाशराव सावंत, पोपटराव जगदाळे, संजय माने, अॅड. नरेंद्र ऊर्फ युवराज बर्गे, जालिंदर भोसले, बशीरखान पठाण, प्रवीण कदम, संतोष ढाणे यांचा समावेश आहे. खजिनदारपदी अमरसिंह बर्गे यांची नियुक्ती झाली आहे. सरचिटणीसपदी आठ जणांची नियुक्ती झाली असून, त्यात विलासराव धर्माधिकारी, संतोष शेलार, जयवंत घोरपडे, युवराज फाळके, अॅड. सतीश कदम, सुभाष ऊर्फ नाथा कदम, शंकर येवले, बबन खंडाईत यांचा समावेश आहे. चिटणीस म्हणून विशाल जगदाळे, सुनील वाघ, अनिकेत भोसले, शिवाजी शिरतोडे यांना नेमण्यात आले आहे.

हेही वाचा: Election 2021 : राष्ट्रवादीच्या उमेदवारांपुढं तगडं आव्हान

या कार्यकारिणीमध्ये ४१ सदस्य असून, त्यात अॅड. विजयराव कणसे, अविनाश फाळके, मनोहर बर्गे, नाजीम इनामदार, आनंदराव जाधव, विशाल चव्हाण, अॅड. जयवंतराव केंजळे, प्रतापराव पवार, रवींद्र जगताप, हमीदखान पठाण, अविनाश गायकवाड, सुरेश सकुंडे, सुनील भोसले, अधिक जगताप, दामोदर वाघ, रवींद्र माने, प्रकाशराव सावंत, डॉ. रणजित सावंत, श्रीरंग सापते, गुजाबा जाधव, भैय्यासाहेब जगदाळे, सुनील उबाळे, जगन्नाथ कुंभार, अॅड. तानाजी पवार, अतुल रानभरे, सुधीर आडागळे, ज्ञानदेव लोखंडे, कपिल चव्हाण, अर्जुन जाधव, रोहित भोईटे, उत्तमराव नलगे, अक्षय खोमणे, शंकर गोळे, शिवराज शिर्के, इकबाल शेख, आब्बास पटेल, इम्तियाज इनामदार, सोमनाथ शिंदे, किशोर जगदाळे, योगेश भोईटे, रणजित वाघ यांचा समावेश असल्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. जाधव यांनी यासंदर्भातील प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

हेही वाचा: Election 2021 : आमदार शिंदे-रांजणे यांच्यात 'High Voltage' लढत

loading image
go to top