Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Koyna Dam Flood Alert : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने धरणातून ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सहा दरवाजे ६ फूट उघडण्यात आले असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
Koyna Dam Water Release

Koyna Dam Water Release

esakal

Updated on

Koyna Dam News : कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज (१ ऑगस्ट २०२६) सकाळी १० वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ४ फुटांवरून ६ फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com