कोयनेचे नयनरम्य वैभव अल्पावधीतच जागतिक पातळीवर येणार- गृहराज्यमंत्री देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोयनेचे नयनरम्य वैभव अल्पावधीतच जागतिक पातळीवर येणार

कोयनेचे नयनरम्य वैभव अल्पावधीतच जागतिक पातळीवर येणार

कोयनानगर : देशहित जोपासणारे भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रेमळ व हाडाचे देशभक्त होते. जगाला शांततेचा संदेश देवून पंचशील ही लाख मोलाची देणगी त्यांनी जगाला दिली. धरण परिसर हा तीर्थक्षेत्र असल्याचा गौरव उद्दगार त्यांनी कोयना परीसराला भेट दिल्यावर काढले होते. निसर्गरम्य असणाऱ्या कोयना परिसराला देशात वेगळे महत्व आहे. निसर्ग हे कोयनेचे वैभव असून कोयनेचे हे वैभव महाविकास आघाडीच्या माध्यमातून अल्पावधीतच जगाच्या पातळीवर आणणार असल्याचे प्रतिपादन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी केले.

हेही वाचा: ..त्यापेक्षा विक्रम गोखलेंनी राजकीय पक्षात प्रवेश करावा- पृथ्वीराज चव्हाण

भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवशी साजरा केला जाणारा बालदिन पंडित नेहरू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोयनानगर येथील नेहरू स्मृती उद्यानात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार रमेश पाटील, गटविकास अधिकारी मीना साळुंखे , शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नियोजन समिती सदस्य जयवंतराव शेलार ,कोयना प्रकल्पाचे उप अभियंता आशिष जाधव ,अशोकराव पाटील ,मा. सरपंच शैलेंद्र शेलार ,सपोनी चंद्रकात माळी,गट शिक्षणधिकारी दीपा बोरकर ,प्रमोद जाधव ,सरपंच हेमंत चाळके शाखा अभियंता राजीव खंदारे आदी प्रमुख उपस्थित होते.

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई पुढे म्हणाले की कोविड संसर्गामुळे दोन वर्षापासून बहरलेले कोयनेचे पर्यटन ठप्प आहे.त्यात पावसाळ्यात कोयना विभागात झालेल्या भूसल्खनामुळे याला गालबोट लागले आहे. आपण केलेल्या कोयना पर्यटन आराखड्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे.पर्यटन क्षेत्र विकसित करण्याबरोबर शासनाने मंजूर केलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र व राज्य आपत्ती दल हे केंद्र लवकरच उभे केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा: ब्रँड अँबेसिडर राहिलेल्या विक्रम गोखलेंनी एसटीच्या संपावर व्यक्त केल्या भावना!

कोयनानगर येथील नेहरू उद्यानातील पंडित नेहरू यांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार व पूजन गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी करून बालदिन उत्सवाला सुरवात करण्यात आली.नेहरू उद्यानात प्रवेश करण्यासाठी कोयना प्रकल्पाने शुल्क आकारले आहे. कोयना विभागातील जनतेला नेहरू उद्यानात नि शुल्क प्रवेश मिळावा अशी मागणी निवेदनाद्वारे विभागातील बाल गोपाळांनी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे केली आहे. नेहरू उद्यानात बालदिनाचे औचित्य साधून सर्वाना मोफत प्रवेश असल्याने ठिकठिकाणा हून आलेल्या बालकांनीनेहरू उद्यानात तोबा गर्दी केल्यामुळे कोयनानगर ला बालनगरचे स्वरूप आले होते.

नेहरू कोयना प्रक्ल्पाने बालदिना निमित नेहरू उद्यानांची सजावट करताना मोठ्या प्रमाणात रंगिबेरगी छत्री टांगल्या होत्या. दुपारी २.०० वाजल्यापासून कोयनानगर येथे अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे या छत्र्या विनावापर भिजून गेल्या आहेत.

loading image
go to top