'बालदिनी' कोयनानगर होणार 'बालनगर' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'बालदिनी' कोयनानगर होणार 'बालनगर'

सातारा : 'बालदिनी' कोयनानगर होणार 'बालनगर'

कोयनानगर : लहान व आबालवृद्ध पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण असणारे कोयनानगर येथील नेहरू स्मृती उद्यान बऱ्याच दिवसा नंतर नटलेले आहे. देशभरात साजरा केला जाणारा बालदिन नेहरू उद्यानात मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे. नेहरू उद्यान सर्व पर्यटकांसाठी खुले राहणार असल्याने बालदिनाला कोयनानगर ला बालनगर चे स्वरूप येणार .

भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशभरात बालदिन म्हणून उत्साहात साजरा केला जातो. कोयना धरणाच्या निर्मिती वेळी पंडित नेहरू ज्या टेकडीवर आले होते त्या ठिकाणी कोयना प्रक्ल्पाने लाखो रूपये खर्च करूननेहरू स्मृती उद्यान उभे करून पंडित नेहरू यांची आठवण जतन केली आहे.अल्पावधीत हे नयनरम्य उद्यान पर्यटकांचे आकर्षण बनले आहे.दरवर्षी लाखो पर्यटक या उद्यानात येतात.

हेही वाचा: मधुमेह असल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवणे का महत्त्वाचे?

नेहरू उद्यानाची निर्मितीला 21 वर्ष पूर्ण झाले असली तरी गत सात वर्षापासून पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी तथा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी शासकीय स्तरा वर बालदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गतवर्षी कोरोना संकट जगावर असल्याने कार्यक्रमाला बंदी होती.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे बालदिनाचा पहिला शासकीय कार्यक्रम पाटण तालुक्यात होत आहे.

नेहरू उद्यानात बालदिना दिवशी सर्व बालकांना मोफत प्रवेश मिळत असल्याने राज्यातून हाजारो पर्यटक नेहरू उद्यानात येतात.

हेही वाचा: पुणे महापालिका आयुक्तांचे ‘खड्डेदर्शन’ दीड तासात आटोपले

यामुळे नेहरू उद्यान बालचमूमुळे गर्दीने ओसंडून वाहत असते. बालकांची अलोट गर्दीने कोयनानगर हाऊसफुल होते. यामुळे कोयनानगर ला बालनगरचे स्वरूप येते.

14 नोव्हें या बालदिनाला तालुका प्रशासन व कोयना परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत. पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

loading image
go to top