नियमानूसार येत्या 20 दिवसांत निवडणूकीची तारीख जाहीर हाेऊ शकते

कारखान्याचे कामेरी येथील ज्येष्ठ सभासद अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व शासनाकडे कोरोनाची स्थिती पाहता कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यावर अद्यापही निर्णय नाही. शासानाने त्या अर्जाचा विचार करण्याची गरज आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तो अर्ज निकालीही काढावा लागणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.
Election
ElectionEsakal
Updated on: 

कऱ्हाड (जि. सातारा) : रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या (Krishna Sugar Factory) सभासदांच्या अंतिम याद्या गुरुवारी प्रसिद्ध झाल्या. 47 हजार 160 सभासदांचा यादीत समावेश आहे, अशी माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक (Regional Joint Director of Pune Sugar Association) धनंजय डोईफोडे यांनी दिली. पूर्वीच्या 46 हजार 340 सभसादांच्या यादीत अक्रियाशीलपैकी 820 सभासदांना स्थान मिळाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. कारखान्याची अंतिम यादी जाहीर प्रसिद्ध झाल्याने 20 दिवसांत कारखान्याची निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते, असा अंदाज आहे. (Krishna Sugar Factory Election Satara Marathi News)

सातारा व सांगली जिल्ह्यांतील पाच तालुक्‍यांचे कार्यक्षेत्रातील रेठऱ्याच्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखन्याच्या कच्च्या यादीवर 158 हरकतीपैकी 130 हरकती निकाली काढल्या. 28 हरकती मंजूर आहेत. त्यामध्ये अक्रियाशील 2525 पैकी 820 सभसादांचा यादीत समावेश झाला आहे. कऱ्हाड व वाळवा तालुक्‍यांत सर्वाधिक सभासद आहेत. ती प्रक्रिया पूर्ण करून पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालकांनी गुरुवारी अंतिम यादी जाहीर केली. त्यामुळे 20 दिवसांत कृष्णाची निवडणूक जाहीर होऊ शकते.

Election
शेतकऱ्यांबाबत मोदी सरकारचे धोरण फसवे, दुफळी निर्माण करणारे : पृथ्वीराज चव्हाण

अंतिम याद्या प्रसिद्ध झालेल्या दिवसापासून 10 दिवसांनंतर व वीस दिवसांच्या आत निवडणूक कार्यक्रम जाहीर होतो. त्यामुळे वीस दिवसांत कृष्णाच्या निवडणुकांचा अधिकृत बिगुल वाजण्याची शक्‍यता आहे. प्रादेशिक सहसंचालक श्री. डोईफोडे म्हणाले, ""कृष्णा कारखान्याच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. पहिल्यांदा कच्चा याद्या जाहीर झाल्या. त्यावर 158 हरकतींपैकी 130 हरकती फेटळल्या. 28 हरकती मंजूर आहेत. मंजूर हरकतीनुसार अक्रियाशील 820 सभासदांनाही क्रियाशील केले. मूळच्या 46 हजार 340 व क्रियाशील झालेल्या 820 अशा एकूण 47 हजार 160 सभासदांची अंतिम यादी जाहीर झाली. त्यामुळे यादी दहा दिवसांनंतर व 20 दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होतच असतो.''

निवडणुकीच्या स्थगिती अर्जाचीही उत्सुकता

कारखान्याचे कामेरी येथील ज्येष्ठ सभासद अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह व शासनाकडे कोरोनाची स्थिती पाहता कृष्णा कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. त्यावर अद्यापही निर्णय नाही. शासानाने त्या अर्जाचा विचार करण्याची गरज आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी तो अर्ज निकालीही काढावा लागणार आहे. त्यामुळे त्याचीही उत्सुकता आहे.

Election
वडिलांसमाेरच विश्वजित बुडाला; आईने घटनास्थळी घेतली धाव
Election
'मराठे पाठीमागून वार करत नाहीत, समाेरुन करतात'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Protesting remarks on farmers and demanding a public apology.
Yellow Wagtail bird deaths in Maharashtra
Maharashtra Crop Loss Compensation News Farmers Await Five Thousand Rupees Advance Aid With 33 Percent Damage Eligibility Criteria
Harshada Deshmukh Wins in Satara NCP Workers Celebrate Victory With Gulal and Enthusiastic Slogans Across the City