
वाई: कुसगाव येथील दगडखाण व स्टोन क्रशरला परवानगी दिल्याच्या निषेधार्थ जिल्हा प्रशासनाच्या विरोधात मंत्रालयाच्या दिशेने निघालेला ग्रामस्थांचा मोर्चा सातव्या दिवशी पुण्यातील वाकडपर्यंत पोहोचला. दरम्यान, सरकार आम्हाला न्याय देऊन आमचा सन्मान करू शकत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मिळणारा ‘सन्मान निधी’ नको, असा निर्धार महिलांनी केल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.