

Commuters stranded as 200 ‘Lalpari’ buses used for Chief Minister’s event; public outrage over transport misuse.
Sakal
सातारा : दिवाळीची सुटी संपवून पुन्हा पुणे-मुंबईसह इतर भागातील नोकरी, व्यवसायाला परतणारे आज अक्षरश: केविलवाण्या स्थितीत रस्त्यावर उभे असल्याचे चित्र आज सर्वत्र होते. काही मोजक्या बस महामार्गावरून धावत होत्या. त्या बस पाहून प्रवासी हातवारे करीत अक्षरश: आम्हाला न्या हो, अशा विनवण्या करत पाच-पाच तास कुटुंबातील महिला-मुलांसह ताटकळत उभे असल्याचे दिसून आले आणि त्याला कारण ठरला तो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फलटण येथील कार्यक्रम. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने एसटी महामंडळाच्या जिल्ह्यातील तब्बल २०० हून अधिक बस त्यांच्या दिमतीला पाठवण्यात आल्या होत्या. त्याचा फटका मात्र बसस्थानकावरील तसेच महामार्गावरील सर्वसामान्य प्रवाशांना बसला.