

Leopard Pounces from Grass, Elderly Woman Survives Near-Fatal Attack
Sakal
-राजेश पाटील
ढेबेवाडी : वेळ सकाळी साडेदहाची, कडाक्याच्या थंडीमुळे डोक्यापासून गळ्यापर्यंत मोठा स्कार्फ घट्ट बांधून घेऊन शेतात जनावरांसाठी चारा कापत बसलेली वृद्ध महिला आणि तिच्याच पुढ्यात गवतात लपून झडप टाकण्याच्या तयारीत बसलेला बिबट्या... काही सेंकदाची नजरा- नजर होताच बिबट्या वृद्धेकडे झेपावला, खरं तर त्याची झेप तिच्या गळ्याकडे होती; परंतु बांधलेल्या स्कार्फमुळे चावा चुकला आणि डाव्या हाताचा दंड त्याच्या जबड्यात सापडला. वृद्धेने जिवाच्या आकांताने आरडाओरडा केला अन् आजूबाजूच्या शेतातील लोक धावून आल्यावर जिवावरचे संकट चाव्यावर निभावत तिचे प्राण वाचले.