
कोपर्डे हवेली : नडशी येथील तळी नावाच्या शिवारात नदीवरील मोटार घराकडे घेऊन जाणाऱ्या समाधान माने या युवकावर बिबट्याने गुरुवारी सकाळी हल्ला केला. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर येणाऱ्या अमोल पवार याच्या प्रसंगावधानामुळे बिबट्या पळून गेल्याने माने बचावले. या घटनेनंतर वन विभागाने तातडीने कारवाई करत याठिकाणी कॅमेरा ट्रॅप आणि सापळा लावला आहे. मात्र, बिबट्याची दहशत वाढली आहे.