esakal | राज्यात घरफोडी करणा-या भांडूपच्या पेईंग गेस्ट बंटी बबलीस लोणंद पोलिसांनी पकडले
sakal

बोलून बातमी शोधा

राज्यात घरफोडी करणा-या भांडूपच्या पेईंग गेस्ट बंटी बबलीस लोणंद पोलिसांनी पकडले

या प्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, तसेच सहायक पोलिस फौजदार शिकिलगार, पोलिस हवालदार गार्डे, महेंद्र सपकाळ, बी. के. पवार, शशिकांत गार्डी, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, महिला पोलिस प्रिया दुरगुडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार श्री. गार्डे करीत आहेत. 

राज्यात घरफोडी करणा-या भांडूपच्या पेईंग गेस्ट बंटी बबलीस लोणंद पोलिसांनी पकडले

sakal_logo
By
रमेश धायगुडे

लोणंद (जि. सातारा) : येथील शहरातील एका घरात भाडेकरू बनून राहात असलेल्या पती- पत्नीने बंटी बबली टाईप घर मालकाच्याच घरातील रोख रक्कम आणि दागिन्यावर डल्ला मारला. अखेर लोणंद पोलिसांनी या बंटी बबलीला अटक केली. 

येथील अशोक अनंत महामुनी यांच्याकडे गेल्या महिन्याभरापासून भाडेकरू म्हणून राहात असलेल्या नवनीत मधुकर नाईक व त्याची पत्नी प्रिया नवनीत नाईक (रा. भांडूप, मुंबई) यांनी घरमालक घरात नसल्याचे पाहून घरातील रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करून पोबारा केला. याप्रकरणी घरमालक अशोक महामुनी यांनी लोणंद पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. लोणंद पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक व पोलिस कर्मचाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पती- पत्नी यांना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी या जोडप्याकडून चोरी केलेले चार तोळे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. 

बाळासाहेबांनी सर्वधर्मसमभाव जोपासत, कष्टकरी जनता, शेतकऱ्यांसाठी अखेरपर्यंत तडफेने काम केले : रामराजे 

संशयित नाईक पती- पत्नी हे बंटी बबली या नावानेही परिचित असून, त्यांच्यावर यापूर्वी सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, नवी मुंबई, जालना, नगर, वाशिम, नागपूर या जिल्ह्यांत घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या संशयितांची गुन्हा करण्याची पद्धत अशी आहे, की हे पेईंग गेस्ट म्हणून ज्या ठिकाणी राहात असत तेथील शेजाऱ्यांशी मैत्री वाढवून शेजारी किंवा घरमालक बाहेरगावी गेल्यावर संधी साधून घरफोडी, चोरी करून पळ काढत होते.
 
या प्रकरणी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल व पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, पोलिस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस नाईक संतोष नाळे, श्रीनाथ कदम, तसेच सहायक पोलिस फौजदार शिकिलगार, पोलिस हवालदार गार्डे, महेंद्र सपकाळ, बी. के. पवार, शशिकांत गार्डी, अविनाश शिंदे, गोविंद आंधळे, केतन लाळगे, विठ्ठल काळे, महिला पोलिस प्रिया दुरगुडे यांनी कारवाईत सहभाग घेतला. या गुन्ह्याचा तपास पोलिस हवालदार श्री. गार्डे करीत आहेत. 

असं मरण्यापेक्षा जेलमध्ये बसलेलं बर; व्यापा-यांची भावना समजून घ्या : शिवेंद्रसिंहराजे 

साताऱ्यात कोरोनाचा विस्फोट! जिल्हाधिकाऱ्यांनी काढला कडक निर्बंधाचा आदेश; जाणून घ्या काय सुरु, काय बंद..

Edited By : Siddharth Latkar

loading image