esakal | महाबळेश्वरात पर्यटकांना शिवीगाळ करून घोडे व्यवसायिकांकडून मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

crime

महाबळेश्वरात पर्यटकांना शिवीगाळ करून घोडे व्यवसायिकांकडून मारहाण

sakal_logo
By
अभिजीत खुरासणे

महाबळेश्वर : जावली येथून पर्यटनासाठी महाबळेश्वरला आलेल्या ओंबळे कुटूंबियांना वेण्णालेक येथे घोडे व्यवसायिकांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सायंकाळी येथे घडली. ओेंबळे यांच्या कुटूंबातील एका महिलेने दिलेल्या तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिसांनी दोन घोडेचालकांना ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा: MobiKwik आणणार 1900 कोटींचा IPO, SEBIची मंजुरी

मुंबईवरील पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जावली तालुक्यातील केडंबे गावातील शहीद तुकाराम ओंबळे यांच्या गावातील कुटूंबातील काही ओंबळे कुटुंबीयांचे सदस्य हे ७ आक्टोंबर रोजी महाबळेश्वर पर्यटनास आले होते. यांनी वेण्णालेक येथे सायंकाळी नौकाविहार केला त्या नंतर त्यांनी वेण्णालेक वरील मोकळया जागेत घोडेसवारीचा आनंद लुटला. तेथुन परत येत असताना एका घोडेवाल्याने ओंबळे यांच्या कुटूंबातील एका महिलेला मागुन धक्का दिला. या वरून घोडेवाले व ओंबळे कुटूंबिय यांच्यात वाद सुरू झाला. नंतर या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

हेही वाचा: अफगाणिस्तानात मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट, ५० जणांचा मृत्यू

या वेळी स्थानिक घोडेवाल्यांनी ओंबाळे कुटुंबातील रामचंद्र ओंबळे, सुरज ओंबळे, प्रथमेश ओंबळे व आबेश ओंबळे यांना लाथाबुक्क्यांनी व हातातील चाबकाने मारहाण केली. या मध्ये दोघांना चाबकाचा मार लागला. त्यांच्या पाठीवर चाबकाचे वळ उठले होते. या प्रकरणी ओंबळे यांच्या कुटूंबातील (-- स्वाती रामचंद्र ओंबळे वय - 32 रा. केडंबे ता जावली ) यांनी ७ आक्टोंबर रोजी रात्री महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

आपल्या कुटुंबियांसोबत ही घटना घडल्याचे समजल्यावर जावळी शिवसेनेचे नेते एकनाथ ओंबळे यांच्या बरोबर शिवसेनेचे पदाधिकारी महाबळेश्वर मध्ये दाखल झाले होते. या घडलेल्या घटनेने संतप्त झालेल्या शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, नाना कदम, प्रवीण शिंदे आदींनी शांत राहण्याचे आवाहन केले. शिवसेनेच्या या पदाधिकाऱ्यांनी आवाहन करताच तणाव निवळला.

ओंबळे कुटूंबातील महीलेच्या तक्रारी वरून महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने मारहाण करणाऱ्या घोडा संघटनेचा अध्यक्ष घोडे व्यावसायीक जावेद खारकंडे व जुबेर वारूणकार दोघे रा. महाबळेश्वर या दोन घोडेवाल्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी या दोघांवर भारतीय दंड विधान कलम 354, 143, 147, 149, 504, 506, 324 कलमा नुसार गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वरचे पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस पुढील तपास करीत आहे.

loading image
go to top